एक्स्प्लोर

ICC Awards : आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंना स्थान

Womens Cricket : पुरुषांप्रमाणे आयसीसीने महिलांचा 2022 वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताच्या सर्वाधिक चार खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

ICC Women's T20I Team of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट महिला T20 संघ जाहीर केला आहे. या संघांत, आयसीसीने 2022 वर्षात टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना निवडलं आहे. ICC ने जाहीर केलेल्या 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला T20 संघात भारताच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान मिळालं आहे. आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयरमध्ये समाविष्ट झालेल्या 11 महिला क्रिकेटपटूंची नाव पुढीलप्रमाणे: 

ICC सर्वोत्कृष्ट T20 महिला संघ 2022

  1. स्मृती मानधना (भारत)
  2. बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)
  3. सोफी डिव्हाईन (कर्णधार, न्यूझीलंड)
  4. अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  5. ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  6. निदा दार (पाकिस्तान)
  7. दीप्ती शर्मा (भारत)
  8. रिचा घोष (यष्टीरक्षक, भारत)
  9. सेफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
  10. इनोका रणवीरा (श्रीलंका)
  11. रेणुका सिंग (भारत)
 
View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

टी-20 मध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व 

2022 मध्ये टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यामुळेच भारताच्या बहुतेक खेळाडूंना ICC टीम ऑफ द ईयरमध्ये स्थान मिळाले. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 594 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिने 5 अर्धशतकं झळकावली. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने गतवर्षी 29 विकेट घेत गोलंदाजीत कमाल केली होती. सर्वाधिक विकेट घेणारी ती तिसरी गोलंदाज ठरली. टीम इंडियाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगमध्येही चमक दाखवली. तिच्या बॅटमधून 259 धावा निघाल्या. यादरम्यान आणखी एक भारतीय गोलंदाज रेणुका सिंगनेही कमाल गोलंदाजी केली आणि एकूण 22 विकेट घेतल्या.

पुरुष संघातही भारताची हवा

आयसीसी पुरुष टी20 टीम ऑफ द ईयरचा विचार केला असता यामध्येही भारताचा दबदबा दिसून आला आहे. भारताचे सर्वाधिक म्हणजेच 3 खेळाडू संघात आहेत. भारताचे तीन, पाकिस्तानचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडचे प्रत्येकी एक खेळाडू 2022 च्या ICC च्या सर्वोत्तम T20 संघात स्थान मिळवले आहे. भारतीय खेळाडूंमध्ये दोन स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा (Hardik Pandya) यालाही स्थान देण्यात आलं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget