Majha Katta : फ्री-शिप मिळाली म्हणून भारताला मिळाला रोहित शर्मा, दिनेश लाड यांनी सांगितला खास किस्सा
Dinesh Lad on Majha Katta : नुकतेच द्रोणाचार्य या महान पुरस्काराने सन्मानित झालेले क्रिकेट कोच दिनेश लाड यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात रोहित शर्माबद्दलच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. हा खास कार्यक्रम शनिवारी (1 एप्रिल) सर्व प्रेक्षकांना एबीपी माझा वाहिनीवर पाहता येणार आहे.
Dinesh Lad on Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलेला फलंदाज असून सोबतच एक उत्तम कर्णधारही (Team india Captain) आहे. दरम्यान या महान हिऱ्याची परख करणारे त्याचे कोच दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी रोहितला त्यांनी सर्वात आधी कधी पाहिलं आणि तो कसा घडला असे काही खास किस्से सांगितले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे सर्व किस्से शेअर केले. हा खास कार्यक्रम शनिवारी (1 एप्रिल) सर्व प्रेक्षकांना एबीपी माझा वाहिनीवर पाहता येणार आहे.
तर दिनेश लाड (Dinesh Lad on Majha Katta) यांनी बरेच क्लासिक खेळाडू क्रिकेट जगताला दिले. यामध्ये रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) ही काही खास नावं आहेत. दरम्यान त्यांचा सर्वात टॅलेंटेड खेळाडू असणाऱ्या रोहित शर्माबाबत त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. दरम्यान दिनेश यांची रोहितची नेमकी भेट कुठे झाली ते दोघे एकमेंकाना कसे भेटले याबाबतही त्यांनी सांगितलं. तर दिनेश लाड बोरिवली येथील एका 12 वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या शाळेच्या संघासह पोहोचले होते. स्पर्धेची फायनल लाड यांच्या संघानेच मारली पण त्याच दरम्यान प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूने लाड यांचं लक्ष्य वेधलं. विशेष म्हणजे लाड यांना त्या खेळाडूची गोलंदाजी आवडली होती. हा खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा. रोहितनं त्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याची अॅक्शन लाड यांना खास आवडली. ज्यानंतर त्यांनी लगेचच सामन्यानंतर रोहितशी संपर्क साधला तेव्हा रोहित त्याच्या काकांकडे राहत असल्याने त्याच्या काकांसह रोहित काही दिवसांतच लाड यांच्या शाळेत भेट घेण्यासाठी पोहोचला.
...आणि शाळेने पहिली फ्री-शिप दिली
दरम्यान रोहित आणि त्याचे काका लाड यांच्यासह शाळेच्या डायरेक्टरकडे पोहोचले. सर्व बोलणीही झाली. पण कार्यक्रमातून बाहेर आल्यावर रोहितच्या काकांनी लाड यांना फिबाबत विचारलं. जवळपास 275 इतकी फि त्या शाळेची असल्यानं आपल्याला हे परवडणार नाही असं सांगून रोहितच्या काकांनी अॅडमिशन घेता येणार नाही असं सांगितलं. ज्यानंतर लाड यांनी शाळेच्या डायरेक्टरला विनंती करुन रोहितसाठी फ्री-शिप मिळवून दिली. त्यामुळेच लाड यांच्या प्रशिक्षणाखाली रोहित तयार झाला आणि भारताला स्वत:चा हिटमॅन मिळाला.
हे देखील वाचा-