BCCI : बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 11 खेळाडूंची चांदी, तर 9 खेळाडूंना झटका; वाचा सविस्तर
BCCI Central Contracts : बीसीसीआयने नुकतेच नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्सची लिस्ट जाहीर केली. ज्यात बरेच मोठे उलटफेर दिसून आले.
BCCI Central Contracts 2023 : बीसीसीआयने (BCCI) या वर्षासाठी आपल्या नवीन करारांची अर्थात सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 26 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यंदा 11 क्रिकेटपटूंना फायदा झाला आहे, तर 9 जणांसाठी ही यादी खूपच धक्कादायक ठरली आहे. बीसीसीआयच्या नवीन केंद्रीय करारामध्ये 5 खेळाडूंना बढती मिळाली आहे, तर 6 युवा क्रिकेटपटूंना या यादीत प्रवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दोन खेळाडूंना डिमोशन देखील मिळाले आहे, तर मागील यादीत समाविष्ट असलेल्या 7 खेळाडूंना यावेळी केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.
कोणत्या क्रिकेटपटूंना मिळाले प्रमोशन?
1. रवींद्र जाडेजा: ग्रेड-A ते ग्रेड-A+
2. हार्दिक पंड्या: ग्रेड-सी ते ग्रेड-ए
3. अक्षर पटेल: ग्रेड-बी ते ग्रेड-ए
4. सूर्यकुमार यादव: ग्रेड-सी ते ग्रेड-बी
5. शुभमन गिल: ग्रेड-सी ते ग्रेड-बी
कोणाला प्रवेश मिळाला?
ईशान किशन, दीपक हुडा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांचा पूर्वीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत समावेश नव्हता, मात्र यावेळी या सहा खेळाडूंना ग्रेड-सीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
कोणत्या खेळाडूंचे डिमोशन झाले?
1. केएल राहुल: ग्रेड-ए ते ग्रेड-बी
2. शार्दुल ठाकूर: ग्रेड-बी ते ग्रेड-सी
कोणते खेळाडू गेले बाहेर?
अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा यांचा गेल्या वेळी ग्रेड-बीमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी या दोघांनाही केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. यासह भुवनेश्वर कुमार, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा आणि दीपक चहर यांनाही नवीन करारात स्थान मिळालेले नाही. या 5 खेळाडूंचा पूर्वीच्या केंद्रीय करारात ग्रेड-सीमध्ये समावेश करण्यात आला होता.
अशी आहे बीसीसीआयची नवीन केंद्रीय करार यादी
ग्रेड-A+ (7 कोटी प्रतिवर्ष): रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा
ग्रेड-अ (वार्षिक 5 कोटी): हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल
ग्रेड-बी (3 कोटी वार्षिक): लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.
ग्रेड-सी (वार्षिक 1 कोटी): शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, वॉशिंग्टन सुंदर.
भुवनेश्वर कुमारला केंद्रीय करारातून वगळणे धक्कादायक
गेल्या वर्षी टीम इंडियासाठी भुवनेश्वर कुमार टी-20 क्रिकेटमध्ये प्रमुख गोलंदाज राहिला होता. काही सामने सोडता त्याची कामगिरीही उत्कृष्ट होती. असं असतानाही त्यांना केंद्रीय करारातून वगळणे हा आश्चर्यकारक निर्णय होता. 33 वर्षीय भुवनेश्वरबाबत बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बोर्ड आता त्याच्याऐवजी युवा वेगवान गोलंदाजांना प्राधान्य देऊ इच्छित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भुवीलाही भविष्यात टीम इंडियात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जर तो पुन्हा आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बनला तर तो टीम इंडियाचा भाग नक्कीच बनू शकतो.
हे देखील वाचा-