IND vs WI : वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
IND vs WI T20 series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेला पराभव मागे टाकून भारतीय संघ नवी सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे.
![IND vs WI : वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड he All-India Senior Selection Committee has picked an 18-member squad for the upcoming Paytm ODI and T20I series against the West Indies. IND vs WI : वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/1929e2814ef9fca50b875a4573483bfb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India Squad For West Indies Series : वेस्ट विंडिज विरोधात होणाऱ्या एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची निवड केली आहे. दुखापतीनंतर रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याने बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कुलच्याची जोडी आपल्याला पाहाला मिळू शकते. दक्षिण आफ्रिकामधील खराब कामगिरीमुळे रविचंद्रन अश्विनला वगळण्यात आले आहे. युवा फिरकीपटू रवि बिश्नोईला एकदिवसीय आणि टी२० मालिकेत संधी देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना वेस्ट विंडिजविरोधातील मालिकेत आराम देण्यात आला आहे. केएल. राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. रविद्र जाडेजा दुखापतीमुळे वेस्ट विंडिजविरोधच्या मालिकेतून आराम देण्यात आला आहे. अक्षर पटेलने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. T20 मालिकेत अक्षर पटेल खेळणार आहे.
एकदिवसी संघ ODI squad -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
T20I squad: Rohit Sharma(Capt),KL Rahul (vc),Ishan Kishan,Virat Kohli,Shreyas Iyer,Surya Kumar Yadav, Rishabh Pant (wk),Venkatesh Iyer,Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi,Axar Patel, Yuzvendra Chahal, Washington Sundar, Mohd. Siraj, Bhuvneshwar, Avesh Khan, Harshal Patel
— BCCI (@BCCI) January 26, 2022
T20I squad :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
ODI squad: Rohit Sharma (Capt), KL Rahul (vc), Ruturaj Gaikwad, Shikhar, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Deepak Hooda, Rishabh Pant (wk), D Chahar, Shardul Thakur, Y Chahal, Kuldeep Yadav, Washington Sundar, Ravi Bishnoi, Mohd. Siraj, Prasidh Krishna, Avesh Khan
— BCCI (@BCCI) January 26, 2022
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)