Harshit Rana : हर्षित राणाचा कहर, 6 बॉलमध्ये 4 विकेटचा फडशा, PM इलेव्हन संघाला काहीच मिनिटात लोळवलं!
ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया कॅनबेरामध्ये पीएम इलेव्हनसोबत सराव सामना खेळत आहे.
Prime Ministers XI vs India, 2-day Warm-up Match : ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया कॅनबेरामध्ये पीएम इलेव्हनसोबत सराव सामना खेळत आहे. सराव सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीदरम्यान विराट कोहली, जसप्रीत बुमराह मैदानावर दिसले नाहीत.
#HarshitRana's 4/44 restricts Prime Minister's XI to 240 runs! 👏
— Star Sports (@StarSportsIndia) December 1, 2024
Over to team India's batters, to put on a show! 💪💙#AUSvINDonStar Warm-up match 👉 LIVE NOW on Star Sports! #ToughestRivalry #AUSvIND pic.twitter.com/kzbf4Fgfqs
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच दोन गडी बाद करत चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर सलामीवीर सॅम कोन्स्टास नावाचे वादळ आले, ज्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीचा चांगलाच सामाचार घेतला आणि उत्कृष्ट शतक ठोकले. त्याच्या या शतकीय खेळीमुळे सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन संघाने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
A Sundar-Jadeja jugal-bandi! 🎯
— Star Sports (@StarSportsIndia) December 1, 2024
Jadeja bowls, Sundar catches. Sundar bowls, Jadeja catches. The dynamic duo do it all, flip the roles, same result! 🔄🔥#AUSvINDonStar Warm-up match 👉 LIVE NOW on Star Sports! #ToughestRivalry pic.twitter.com/SGDXIGOYAL
ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हनने 43.2 षटकात 240 धावा केल्या. सलामीवीर सॅम कोन्स्टान्साने शानदार फलंदाजी करत 97 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. कॉन्टास व्यतिरिक्त हॅनो जेकब्सने 60 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या, तर जॅक क्लेटनने 40 धावा केल्या, ज्यामुळे भारताला लढाऊ धावसंख्या उभारण्यात संघाला यश आले.
हर्षित राणाचा कहर
याच सामन्यात हर्षितला पहिल्या चार षटकांमध्ये चांगला धुतला, पण त्यानंतर त्याने अप्रतिम पुनरागमन केले आणि अवघ्या सहा चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतल्या. त्याने अप्रतिम गोलंदाजी करत सहा षटकांत 44 धावा देत चार बळी घेतले, तर आकाश दीपला दोन बळी मिळाले. मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. मात्र, या सामन्यात संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली नाही.
𝐑𝐀𝐍𝐀 𝐉𝐈 𝐎𝐍 𝐅𝐈𝐑𝐄 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) December 1, 2024
Double blow by #HarshitRana, dismisses a settled Clayton and follows up with Davies, rattling Australia’s batting order in the #PinkBallTest 🤯#AUSvINDonStar Warm-up match 👉 LIVE NOW on Star Sports! #ToughestRivalry pic.twitter.com/t7DkGfLPja
हे ही वाचा -