एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याने 'श्रीवल्ली' गाण्यावर आजीसह केला डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून दोघंही सोशल मीडियावर कायम चर्चेत आहेत.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पत्नी नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून दोघंही सोशल मीडियावर कायम चर्चेत आहेत. याचदरम्यान हार्दिक पांड्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसत आहे. हार्दिक पांड्यासोबत त्याची आजी देखील नाचताना दिसत आहे. सदर व्हिडीओ हार्दिक पांड्याने 26 जानेवारी 2022 रोजी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटानंतर हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओसह 'आमची पुष्पा आजी', असंही म्हटलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?

रेडिटवरील एका पोस्टद्वारे हार्दिक आणि नताशाचं घटस्फोटाचं कारण जाणून न घेता नेटकऱ्यांनी नताशाला दोष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये हार्दिक पांड्याची चुकी आहे, असा दावाही करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि हेच घटस्फोटामागील महत्वाचं कारण ठरलंय. सदर पोस्ट करणाऱ्याने म्हटलंय की, नताशासोबत लग्न झाल्यानंतर हार्दिक पांड्याने सर्व जुन्या सवयी सोडल्या होत्या. मात्र 2023 पासून हार्दिकने इतर मुलींसाठी नताशाची फसवणूक सुरु केली. यावेळी नताशाने हार्दिक पांड्याला रंगेहाथ पकडलं आणि खऱ्या अडचणी सुरु झाल्या.  यानंतर दोघांनीही एकमेकांची बदनामी न करता शांततेत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ही माहिती मला त्यांच्यासोबत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीने दिली, असा दावाही या पोस्टद्वारे करण्यात आला आहे.

हार्दिक पांड्याने टी-20 विश्वचषकात दाखवली आपली ताकद...

अलीकडेच भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे महत्त्वाचे योगदान होते. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही या खेळाडूने आपली ताकद दाखवली. विशेषत: हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने सामन्याचे चित्र बदलून टाकले. 

चार वर्षांचा संसार मोडला-

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

संबंधित बातमी:

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Embed widget