एक्स्प्लोर

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce News Marathi: घटस्फोटाबाबत माहिती देण्याआधी नताशा भारतसोडून परदेशी रवाना झाली होती. तिच्यासोबत मुलगा अगस्त्य देखील होता.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वविजेतेपदाचा हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. पत्नी नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) मध्यंतरी लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चाना उधाण आले. गुरुवारी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहीत चर्चावर शिक्कामोर्तब केले आहे. हार्दिक व नताशाने चार वर्षांनी आपले नाते संपवले आहे.

घटस्फोटाबाबत माहिती देण्याआधी नताशा भारतसोडून परदेशी रवाना झाली होती. तिच्यासोबत मुलगा अगस्त्य देखील होता. हार्दिक पांड्याने घटस्फोटाची सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नताशाने इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच पोस्ट केली आहे. नताशी नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेल्याचं दिसून येत आहे.
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?

चार वर्षांचा संसार मोडला-

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

हार्दिक आणि नताशाने पोस्टद्वारे काय म्हणाले?

'चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू, या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या खासगी आयुष्याचा आदर राखावा ही विनंती. आपल्याकडून यावेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.

-हार्दिक व नताशा

संबंधित बातम्या:

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा; नताशा स्टॅनकोव्हिच मुंबईहून निघाली, सोबत मुलगाही दिसला!

हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, गंभीरची वेगळी रणनीती असेल, पण...; मोहम्मद कैफ रोखठोक बोलला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Embed widget