एक्स्प्लोर

Ind vs Eng 1st ODI : आधी तिलक... आता शुभमन गिलचा 'विश्वासघात', हार्दिकच्या 'त्या' षटकारने उपकर्णधारचा केला गेम; 36 व्या षटकात काय घडलं? Video

नागपूरमध्ये एका टोकावरून विकेट पडत होत्या, पण शुभमन गिल चांगली फलंदाजी करत होता.

Hardik Pandya Explosive Six Missed Shubman Gill Century : पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकीपटू रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीत चमक दाखविल्यानंतर मधल्या फळीत शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने गुरुवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा चार गडी राखून एकतर्फी पराभव केला.

विजयाचे हिरो जरी पाच असले तरी शुभमन गिलने यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता, ज्याला कुठेतरी शतक हुकल्याचे दुःख जाणवत असेल. साकिब महमूदच्या बाउन्सरवर गिल आऊट झाला, पण हा दबाव हार्दिक पांड्याने निर्माण केला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हार्दिकचा एक षटकार संघासाठी चांगला होता, पण गिलसाठी कडू-गोड ठरला. कारण त्यामुळे उपकर्णधार गिलचा खेळ खराब झाला.

हार्दिक पांड्याने नेमके केले तरी काय?

नागपूरमध्ये एका टोकावरून विकेट पडत होत्या, पण शुभमन गिल चांगली फलंदाजी करत होता. गिलने श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलसोबत उत्कृष्ट भागीदारी केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. हळूहळू गिल त्याच्या शतकाच्या जवळ आला. 36 व्या षटकात शुभमन गिल त्याच्या शतकापासून 17 धावा दूर होता आणि भारताला विजयासाठी 24 धावांची आवश्यकता होती. जर गिलला स्ट्राईक आणि बॉल मिळाले असते तर शतक फार दूर नव्हते. पण त्याच षटकात राहुलची विकेट पडली आणि हार्दिक पांड्या आला. पांड्याने पहिला चेंडूवर रन घेतला नाही, पण पुढच्या चेंडूवर षटकार मारून गिलचा खेळ खराब केला. आता भारताला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता होती तर गिलला शतक करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती.

हार्दिक पांड्याचा तो षटकार अन् गिल आला दबावाखाली...

जर हार्दिकने एक धाव घेतली असती तर गिल कोणत्याही दबावाशिवाय हळूहळू त्याचे शतक पूर्ण करू शकला असता. पण हार्दिकच्या षटकारांमुळे त्याच्यावर दबाव निर्माण झाला. 37 व्या षटकात गिल स्ट्राईकवर आला आणि त्याने चौकार मारत 78 धावा पूर्ण केल्या. शतक पूर्ण करण्याच्या घाईत, गिलने साकिब महमूदच्या दुसऱ्या चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो आऊट झाला. हार्दिकने पाठ थोपटली पण शुभमन गिलचा चेहरा पडला होता. त्याने सामन्यात 14 चौकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली.

आधी तिलकचा खेळ केला होता खराब

हार्दिक पांड्याच्या षटकारांमुळे एखाद्या खेळाडूचा गेम खराब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिलक वर्मा यांच्यासोबत असेच घडले होते जेव्हा हार्दिकला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 2023 मध्ये, हार्दिकने षटकार मारून खेळ संपवला तेव्हा तिलक वर्माचे अर्धशतक फक्त 1 धावेने हुकले. त्या दिवशीही, जर हार्दिकला हवे असते तर तो युवा खेळाडू त्याच्या नावावर अर्धशतक जोडू शकला असता.

सोशल मीडियावर चाहते आमने-सामने

हार्दिकच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. हार्दिकचे चाहते त्याला समर्थन देत आहेत आणि स्वार्थी फलंदाजीसाठी गिलला ट्रोल करत आहेत. त्याच वेळी, गिलचे चाहते हार्दिकवर खूप रागावलेले दिसून आले. 

हे ही वाचा -

Shreyas Iyer Ind vs Eng 2nd ODI : मध्यरात्री मला फोन आला अन्... श्रेयस अय्यर दुसऱ्या ODI सामन्यातून बाहेर? जाणून घ्या रात्री नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
Embed widget