Shreyas Iyer Ind vs Eng 2nd ODI : मध्यरात्री मला फोन आला अन्... श्रेयस अय्यर दुसऱ्या ODI सामन्यातून बाहेर? जाणून घ्या रात्री नेमकं काय घडलं?
श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो टीम इंडियासाठी एक मोठा मॅचविनर का आहे.

Shreyas Iyer Ind vs Eng 2nd ODI : श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो टीम इंडियासाठी एक मोठा मॅचविनर का आहे. गुरुवारी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि या विजयात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. अय्यरने फक्त 36 चेंडूत 59 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 9 चौकार मारले. एवढेच नाही तर त्याने 2 षटकारही मारले. तसे, हा सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने एक आश्चर्यकारक खुलासा केला. त्याने सांगितले की, तो नागपूर वनडे खेळणार नव्हता, पण विराट कोहली फिट नसल्याने त्याला संधी मिळाली. श्रेयस अय्यरने एका संभाषणात सांगितले की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कसा सामील झाला.
श्रेयस अय्यरला मध्यरात्री फोन आला अन्...
श्रेयस अय्यरने सांगितले की, 'रात्री मी थोडा वेळ मुव्ही पाहण्याचा विचार करत होतो, पण त्यानंतर मला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला. तो म्हणाला की, विराट कोहलीच्या गुडघ्याला सूज आल्याने तो खेळणार नाही, त्यामुळे कदाचित तू खेळू शकतोस. यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि लगेच झोपलो. पण आता प्रश्न असा आहे की तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल का?
श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर हे स्पष्ट झाले आहे की, हा खेळाडू टीम इंडियाच्या प्लॅन ए चा भाग नाही. म्हणजे, टीम इंडिया त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहत नाहीये. तर प्रश्न असा आहे की, कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यर खेळेल का? आता अय्यरने अर्धशतक झळकावले आहे पण टीम इंडिया प्लॅन बी नुसार काम करेल का हे पाहणे मनोरंजक असेल.
पण, विराटच्या पुनरागमनाने अनेक गोष्टी बदलतील. जर टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला वगळले तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा गिल पुन्हा सलामी देईल. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मग अय्यरसाठी जागा मिळू शकते.
श्रेयस अय्यरने ODI कारकिर्दीतील ठोकले दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खास झाली नाही. 19 धावांच्या धावसंख्येवर संघाला दोन धक्के बसले होते. यशस्वी जैस्वाल 15 धावा काढून बाद झाला आणि रोहित शर्मा दोन धावा काढून बाद झाला होता. यानंतर, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 64 चेंडूत 94 धावांची भागीदारी झाली.
श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 30 चेंडू घेतले. या फॉरमॅटमध्ये हे त्याचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

