Ind vs Sa 1st Test : पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा… माजी खेळाडूकडून गंभीर अन् आगरकरांची पोलखोल; एका वर्षाचं सगळं काढलं
Venkatesh Prasad on Gautam Gambhir Ajit Agarkar : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताला तिसऱ्याच दिवशी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

India Loss To South Africa 1st Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताला तिसऱ्याच दिवशी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दोन दिवसांत सामना आपल्या बाजूला फिरवलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णपणे गुडघे टेकले. अवघ्या 124 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची केवळ 93 धावांवर ऑलआऊट झाली. या पराभवानंतर माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीवर जोरदार टीका केली.
व्यंकटेश प्रसाद काय म्हणाले?
व्यंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले आहे की, "आपण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण आता अशा प्रकारच्या कामगिरीमुळे आपण स्वतःला अव्वल दर्जाचा कसोटी संघ म्हणू शकत नाही. निवड प्रक्रियेतली रणनीती संघाचे नुकसान करत आहे. गेल्या एक वर्षात, इंग्लंडमधील अनिर्णित मालिकेशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये निकाल अत्यंत निराशाजनक राहिले आहेत."
व्यंकटेश प्रसादकडून गंभीर अन् आगरकरांची पोलखोल
व्यंकटेश प्रसाद याने थेट मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांना जबाबदार धरले. गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताचा कसोटीतील कामगिरी सातत्याने चर्चेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र गंभीरच्या संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. 18 पैकी फक्त 7 सामने जिंकले, 9 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले. प्रसाद यांच्या मते, संघात ठोस योजनेशिवाय सतत बदल केले जात आहेत आणि त्यामुळे संघातील स्थैर्य ढासळत आहे.
शुभमन गिलची दुखापत ठरली डोकेदुखी
भारतीय कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाहीत. पहिल्या डावात केवळ तीन चेंडू खेळल्यानंतर मानेला दुखापत झाल्याने त्यांना रिटायर्ड हर्ट व्हावे लागले आणि नंतर त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. आधीच दबावाखाली असलेल्या भारतीय फलंदाजीला कर्णधाराच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसला.
अफ्रिकन फिरकीपटू ठरला मॅच-विनर
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी फरक निर्माण केला. सायमन हार्मरने दोनही डावांत चार-चार अशा एकूण आठ विकेट्स घेतले. दुसरीकडे केशव महाराजने तर दुसऱ्या डावात केवळ दोन चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेत भारताला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले. त्याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना श्वास घेण्याचीही संधी मिळाली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
हे ही वाचा -





















