एक्स्प्लोर

Ind vs Sa 1st Test : आता तरी शमीला बोलवा...! टीम इंडियाच्या पराभवानंतर दादा भडकला; गंभीरला दिला कडक इशारा, नेमकं काय म्हणाला गांगुली?

Team India Kolkata Test loss Marathi News : कोलकात्यातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने धुव्वा उडवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sourav Ganguly on Gautam Gambhir : कोलकात्यातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने धुव्वा उडवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारताची ताकद म्हणून ओळखली जाणारी फिरकी आता खरोखरच कमकुवत झाली आहे का? भारताने घरच्या मैदानावर स्पिनिंग ट्रॅक तयार करणे आता बंद करावी का? अवघ्या तीन दिवसांत कसोटी संपून भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर ईडनच्या पिचवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पिचवरील सर्व आरोप फेटाळून लावत टीम इंडियाला कडक सल्ला दिला आहे.

सौरव गांगुली कडक शब्दात नेमकं काय म्हणाला?

गांगुली म्हणाला की, ईडन गार्डन्सची खेळपट्टी भारतीय संघाने जशी मागणी केली होती तशीच तयार करण्यात आली. पण घरच्या मैदानावर वर्चस्व मिळवण्यासाठी पिचमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करणे आता बंद केले पाहिजे. त्यांच्या मते, चांगली पिच म्हणजे अशी जी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी देते, ज्यावर 350+ धावा ही होतील आणि गोलंदाजांनाही विकेट मिळवण्याचा आत्मविश्वास येईल.

“शमीला घ्या… आशा करतो गंभीर ऐकत असतील”

दादा पुढे म्हणाला की, गौतम गंभीरने खेळपट्टी बदलण्यापेक्षा आपल्या गोलंदाजी सामर्थ्यावर विश्वास ठेवायला हवा. बुमराह आणि सिराज चांगली गोलंदाजी करत आहेतच, पण मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शमीमध्ये भारताला एकहाती सामना जिंकवण्याची ताकद आहे. गांगुलींच्या या विधानावरून स्पष्ट होतं की ते कसोटीसाठी विशेष स्पिन पिचची मागणी करणं योग्य मानत नाहीत.

गंभीरचं पिचबाबतचं वक्तव्य

कसोटी संपल्यानंतर गंभीर यांनी सांगितलं होतं की त्यांना हवी तशीच पिच मिळाली. क्यूरेटरने पूर्ण सहकार्य केलं. 124 धावा म्हणजे सहज पाठलाग करता येण्यासारखा स्कोअर होता, आणि भारत हरला तो खराब खेळामुळे, पिचमध्ये काही दोष नव्हता, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

मात्र गंभीर कितीही बचाव करत असले तरी वास्तव स्पष्ट आहे. 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, स्पिन पिचची मागणी केली आणि त्याचाच फटका भारतीय संघालाच बसला.

शमीवर गांगुलींचा ठाम विश्वास

शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही फिटनेस निकषांच्या आधारावर त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. 64 टेस्टमध्ये 229 बळी घेणाऱ्या शमीने शेवटचा कसोटी सामना 2023 मधील WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 

हे ही वाचा -

Shubman Gill discharged hospital : हाताला सलाईन, मानेला पट्टा! शुभमन गिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, पण व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, गौतम गंभीर काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
Embed widget