(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ: इंग्लंड- न्यूझीलंड यांच्यात आज मोठा सामना, विजयी संघ फायनलमध्ये देणार धडक
T20 WC 2021, Match 43, ENG vs NZ: शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) आजचा सामना खेळला जाणार आहे.
T20 WC 2021, Match 43, ENG vs NZ: आयसीसी टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज इंग्लंड -न्यूझीलंड (England, New Zealand) यांच्यात रंगणार आहे. शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) आजचा सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या संघाने नेतृत्व ईयॉन मार्गन करणार आहे. तर, न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी केन विल्यमसन संभाळत आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक देणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंडनं साखळी फेरीत दमदार कामगिरी करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवलंय. या स्पर्धेत दोन्ही संघांनी सुपर-12 फेरीतील एकच सामना गमवलाय. महत्वाचे म्हणजे, इंग्लंडच्या संघानं एकदाच टी-20 विश्वचषक जिंकलाय. तर, न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकही स्पर्धा जिंकता आली नाही. या स्पर्धेत विजय मिळवून न्यूझीलंडचा संघ प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे.
इंग्लंड संघ-
जोस बटलर (विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, मोईन अली, इऑन मॉर्गन (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुडबेंच डेव्हिड विली, जेम्स विन्स, रीस टोपले, टॉम कुरन
न्यूझीलंड संघ-
मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी, ट्रेंट बोल्टबेंचटॉड अॅस्टल, काइल जेमिसन, टिम सेफर्ट, मार्क चॅपमनॉ
आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये धडक देणार आहेत. त्यानंतर टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-
Indian Team Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा, रोहित शर्माकडं कर्णधारपद
Mumbai Police: विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारा गजाआड, हैदराबादमधून अटक
दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ, जय हिंद..! कर्णधार म्हणून विराट कोहलीची शेवटची पोस्ट