(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arshdeep Singh: यालाचं म्हणतात संधीचं सोनं करणं, पदार्पणाच्या सामन्यात अर्शदीप सिंहची चमकदार कामगिरी
ENG vs IND 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
ENG vs IND 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची भारताच्या टी-20 संघात निवड झाली. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत अर्शदीप भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर इंग्लडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात त्याची भारतीय संघात एन्ट्री झाली. त्याला मिळालेल्या या संधीचं त्यानं सोनं करून दाखवलं. इंग्लंडविरुद्ध त्यानं दमदार कामगिरी केली.
अर्शदीपची चमकदार कामगिरी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीपनं 3.3 षटक टाकल्या. यातील पहिलं षटक निर्धाव टाकत त्यानं आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानं आपल्या स्पेलमध्ये 18 धावा देऊन दोन विकेट्स मिळवल्या. त्यानं रीस टोप्ले आणि मॅथ्यू पार्किसनला माघारी धाडलं. यादरम्यान, त्याचा इकोनॉमी रेट 5.10 इतका होता.
अर्शदीपची जबरदस्त कामगिरी
आयपीएलच्या मागीत दोन हंगामात अर्शदीप सिंहनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. अर्शदीप सिंहनं 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्ये सर्वोत्तम डेथ ओव्हर गोलंदाजांपैकी एक म्हणून अर्शदीपचा उदय झालाय. आयपीएलच्या मागच्या हंगामान त्यानं 12 सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं केवळ 7.69 च्या इकोनॉमीनं धावा खर्च केल्या, ज्या पंजाबच्या संघासाठी उपयुक्त ठरल्या.
अर्शदीपची आयपीएलमधील कामगिरी
अर्शदीप सिंहनं आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 35 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.39 च्या इकॉनॉमीने 37 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएलमध्ये एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केलाय.
हे देखील वाचा-