ENG vs IND 1st T20: रोहित शर्माचा वर्ल्ड रिकॉर्ड! सलग 13 टी-20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार
ENG vs IND 1st T20: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतानं इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाची धुळ चाखली.
ENG vs IND 1st T20: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतानं इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाची धुळ चाखली. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळं रोहित शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणार रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला सलग 13 सामने जिंकता आले नाहीत.
भारतीय टी-20 संघाचा उत्कृष्ट कर्णधार
दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं भारतीय टी-20 संघाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्माकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं बांग्लादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 4, वेस्ट इंडीजविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 3 आणि इंग्लंड एक टी-20 सामना जिंकलाय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघानं सलग तीन मालिकेत विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलं आहे. ज्यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचा समावेश आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं जिकलेले सलग 13 टी-20 सामने-
बांलादेश विरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका-
पहिला टी-20 सामना | भारताचा आठ विकेट्सनं विजय |
दुसरा टी-20 सामना | भारताचा सात धावांनी विजय |
न्यूझीलंडविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका-
पहिला टी-20 सामना | भारताचा सात धावांनी विजय |
दुसरा टी-20 सामना | भारताचा पाच विकेट्नं विजय |
तिसरा टी-20 सामना | भारताचा सात विकेट्सनं विजय |
चौथा टी-20 सामना | भारताचा 73 धावांनी विजय |
वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका-
पहिला टी-20 सामना | भारताचा सात विकेट्सनं विजय |
दुसरा टी-20 सामना | भारताचा आठ विकेट्नं विजय |
तिसरा टी-20 सामना | भारताचा 17 धावांनी विजय |
श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका-
पहिला टी-20 सामना | भारताचा 62 धावांनी विजय |
दुसरा टी-20 सामना | भारताचा सात विकेट्सनं विजय |
तिसरा टी-20 सामना | भारताचा 6 विकेट्सनं विजय |
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय |
हे देखील वाचा-
- ENG vs IND: टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार, रोहित शर्मानं मोडला विराटचा खास विक्रम!
- ENG vs IND 1st T20: हार्दिकचं दमदार प्रदर्शन, इंग्लंडच्या नाकी नऊ! भारताचा 50 धावांनी विजय
- Arshdeep Singh: अखेर अर्शदीप सिंहची भारतीय टी-20 संघात एन्ट्री! इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज