David Warner News : 'आता कधीच नाही Air India ने प्रवास करणार नाही....' अहमदाबादेत 265 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मोठा निर्णय
Ahmedabad plane crash : अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला.

David Warner On Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान (Ahmedabad Air India Plane Crash) अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला. गुजरातच्या राजधानीत घडलेल्या या घटनेमुळे केवळ भारतातील लोकांनाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले. या वेदनादायक अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) देखील आपले मत व्यक्त केले. वॉर्नरने एका निवेदनात म्हटले आहे की, "या दुर्घटनेनंतर मी पुन्हा कधीही एअर इंडियाने प्रवास करणार नाही."
I will never travel on Air India again!', David Warner's post on social media after the plane crash in Ahmedabad pic.twitter.com/ApcmOrbBAv
— Bharat (@BharatX20) June 14, 2025
डेव्हिड वॉर्नरने उपस्थित केले प्रश्न
ऑस्ट्रेलियाचे माजी महान खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner statement on Ahmedabad plane crash) यानीही एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकदा वॉर्नरने एक्स वर पोस्ट करत लिहिले की, मी एअर इंडियाच्या विमानात बसलो होतो ज्यामध्ये पायलट नव्हता. वॉर्नरने एअर इंडियाला प्रश्न विचारला की जेव्हा तुमच्याकडे पायलट नाही, तेव्हा तुम्ही लोकांना फ्लाइटमध्ये का बसवता? आता अहमदाबादमधील अपघातानंतर वॉर्नरने एअर इंडियाच्या विमानात बसण्यास नकार दिला आहे.
Instagram story of David Warner about AIR INDIA
— Yanika_Lit (@LogicLitLatte) June 13, 2025
I would never fly Air India ever again pic.twitter.com/T6gANBgSac
डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या लीगमध्ये खेळतो. यावेळी डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही, म्हणून तो आयपीएल 2025 मध्ये विकला गेला नाही. पण वॉर्नर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसला. वॉर्नरला भारत आणि भारतातील लोकांबद्दल विशेष प्रेम आहे. या महान ऑस्ट्रेलियन खेळाडूने अनेक वेळा भारताचे कौतुक केले आहे. वॉर्नर या देशाला आपले दुसरे घर मानतो. वॉर्नरने यापूर्वी त्याच्या एका विधानात म्हटले आहे की, जेव्हा तो क्रिकेटमधून निवृत्त होईल तेव्हा त्याला भारतात राहायला आवडेल.
हे ही वाचा -





















