एक्स्प्लोर

David Warner : जवळपास दोन वर्षानंतर वॉर्नरनं ठोकलं दमदार शतक, 'या' कृतीनं छोट्या फॅनलाही केलं खुश

ENG vs AUS : डेव्हिड वॉर्नर यानं आज इंग्लंडविरुद्ध 106 धावा करत शतक ठोकलं आहे, त्याने ट्रेविस हेडसोबत तब्बल 269 रनांची भागिदारी केली आहे.

David Warner century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (AUS vs ENG) तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तब्बल 355 धावा ठोकल्या. त्यात ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार शतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे जानेवारी 2020 मध्ये वॉर्नरनं अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं, त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर वॉर्नरनं शतक ठोकलं असून त्यान 102 चेंडूत 106 रन केले. विशेष म्हणजे या शतकानंतर त्याने आपल्या एका कृतीमुळे छोट्या फॅनलाही खुश केलं.

वॉर्नरनं शतक ठोकल्यानंतर काही वेळातच तो बाद झाला. ऑली स्टोन याने 106 रनवर त्याला बाद केलं असता पॅवेलियनमध्ये परतत असताना वॉर्नरला शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच फॅन्सची गर्दी दिसत होती. याच गर्दीतील एका लहानग्याला वॉर्नरनं थेट आपले ग्लोव्हस दिले, अचानकपणे इतकी मोठी गोष्ट घडल्यामुळे तो चाहताही कमालीचा आनंदी झाला होता. तो लगेचच ग्लोव्ह घेऊन त्याची फॅमिली बसलेल्या ठिकाणी पळाला. वॉर्नरनं शतक ठोकताना घातलेला ग्लोव्ह मिळाल्याने छोटा फॅन आनंदी आणि आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट केला आहेत.

पाहा VIDEO -

या दौऱ्यातील हा शेवटचा सामना असून ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ उत्कृष्ट लयीत दिसला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 355 धावा ठोकल्या. त्यात ट्रॅविस हेड आणि डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकाचा समावेश होता. यामध्ये ट्रॅविस हेडने 130 चेंडूत 152 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत एकूण 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने 102 चेंडूत 106 धावा केल्या. या कालावधीत वॉर्नरने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय मिचेल मार्शनं 30 आणि स्टीव स्मिथनं 21 रन केल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या ऑली स्टोननं सर्वाधिक 4 विकेट्स यावेळी घेतल्या

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mangal prabhat Lodha BMC Mumbai: मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ

व्हिडीओ

Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangal prabhat Lodha BMC Mumbai: मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Embed widget