Sachin tendulkar : 49 वर्षाचा सचिन तेंडुलकर या वयातही शिकतोय काहीतरी नवीन, Video शेअर करत दिली माहिती
Sachin Tendulkar News : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या थायलंडमध्ये आहे, तो तिकडे सुट्टी एन्जॉय करतना दिसत आहे.
Sachin Tendulkar kayaking : क्रिकेट जगतातील महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आजही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये त्याने मैदानात उतरत पुन्हा एकदा बॅटिंग केली त्याच्या बॅटिंगचा क्लास आजही तोच असल्याने त्याची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे टीम इंडियाचं नेतृत्त्व करताना त्याने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिलं. दरम्यान सचिन कायमच काही न काही नवीन करताना दिसतो. कधी तो कूकिंगचे व्हिडीओ पोस्ट करतो तर कधी कोणती वेगळी अॅक्टिव्हिटी करताना दिसतो. आताही तो थायलंडमध्ये असून तिथे एक नवीन कला शिकत आहे. तो कायाकिंग सोप्या शब्दात बोटींग करायला शिकत आहे. त्याने या बोटिंग शिकतानाचा आणि चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सचिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्यामुळे त्याच्या पोस्टही चांगल्याच व्हायरल होत असतात. आता देखील थायलंडमध्ये सुट्टी घालवणारा सचिन तेंडुलकर बोटिंग करण्यापूर्वी बोटिंग शिकताना दिसला. यादरम्यान, एक व्यक्ती सचिनला बोटिंग कशी करायची हे शिकवत आहे. सचिनही बोटिंग करताना हे रिव्हर्स स्विंगसारखे आहे, असं म्हणताना दिसत आहे.
पाहा VIDEO-
View this post on Instagram
सचिनच्या नावावर कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटचेही अनेक विक्रम
सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. सचिनने सर्वाधिक 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतकं झळकावली आहेत. क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये 100 शतकं झळकावणारा सचिन हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक 15 हजार 921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्याच्या या विक्रमाच्या आसपास सध्या जगातील एकही क्रिकेटपटू नाही.
हे देखील वाचा-