Coronavirus: क्रिकेटपटूंसाठी धोक्याची घंटा! एका मागून एक खेळाडू अडकतोय कोरोनाच्या जाळ्यात
Pathum Nissanka Tests Covid-19 Positive: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
Pathum Nissanka Tests Covid-19 Positive: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या संघाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंकाला (Pathum Nissanka) कोरोनाची लागण झाली आहे. जामुळं त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावं लागलं आहे. पथुम निसंकाला क्वारंटाईन करण्यात आलं असून वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पथुम निसंका हा श्रीलंकेच्या संघातील सहावा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला खेळाडू आहे.
श्रीलंका क्रिकेटनं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, "पथुम निसांकाला अस्वस्थ वाटत असल्यानं त्याची काल सकाळी त्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली. ज्यात तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे". पथुम निसांकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
श्रीलंका क्रिकेटचं ट्वीट-
श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 364 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं पहिल्या डावात 554 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चांदीमलनं नाबाद 206 धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कनं चार विकेट्स घेतल्या आहेत.
मालिका वाचवण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न
एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया धुळ चाखल्यानंतर श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा संघ मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु, हा सामना अर्निणित ठरल्यास मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात जाईल.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Tweet: रोहित शर्माची भविष्यवाणी ठरतेय खरी, 10 वर्षापूर्वी सूर्यकुमारबाबत केलेलं ट्वीट होतंय व्हायरल
- IND vs ENG 3rd T20: रोहित शर्मानं सूर्यकुमारचं कौतूक तर केलंच! पण पराभवाचंही सांगितलं कारण
- ENG vs IND: 'विचार करूनच निर्णय घेतले जातात' विराटच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया