Watch : भारताचा आघाडीचा फलंदाज इंग्लंडमध्ये करतोय गोलंदाजी, पुजाराची ओव्हर पाहिलीत का?
Pujara Turns Leg-spinner : चेतेश्वर पुजारा इंग्लंड काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सध्या खेळत असून त्याठिकाणी तो चक्क गोलंदाजी देखील करत आहे.
Cheteshwar Pujara Bowling Video : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा आघाडीचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या संयमी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तासंतास क्रिजवर राहून भेदक गोलंदाजीचा संयमाने सामना करण्याची कला पुजारामध्ये आहे. पण हाच पुजारा आता चक्क गोलंदाजी करताना दिसत आहे. सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना तो लेग स्पीनर म्हणून गोलंदाजी करत असल्याचं दिसून आलं आहे. ससेक्स क्रिकेटने पुजाराचा गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओही त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट केला आहे.
पाहा व्हिडीओ -
An over of @cheteshwar1 bowling. 🚨 pic.twitter.com/I4PdyeCxCx
— Sussex Cricket (@SussexCCC) July 13, 2022
काऊंटी क्रिकेटमध्ये ठोकली सलग चार शतकं
बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत होता. पण आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये चेतेश्वर दमदार कामगिरी कर असून एकामागे एक शतक ठोकत आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिप डिविजन-2 मध्ये ससेक्स संघाकडून खेळताना सलग चार शतकं ठोकली आहेत. नुकतंच त्याने मिडलसेक्सविरुद्ध शतक लगावलं आहे. याआधी त्याने डर्बीशायर, वोरचेस्टरशायर आणि डरहम संघाविरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे काउंटी चॅम्पियनशिपच्या या हंगामात पुजाराच्या चार शतकांमध्ये दोन दुहेरी शतकांचा समावेशही आहे.
काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा दुसराच भारतीय
पुजाराने या हंगामात डर्बीशायरविरुद्ध दुहेरी शतक ठोकलं. दरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये ही आकडेवारी पार करणारा पुजारा दुसराच भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी केवळ भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने 1991 आणि 1995 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतकं लगावली होती.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मिथून-अश्मिता मात्र स्पर्धेबाहेर