IPL 2021 : आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेला धक्का, 'या' ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार
आयपीएल 2020 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने हेजलवुडला आपल्या संघात सामील करुन घेतलं होतं. यावेळी आयपीएल भारतात होत असल्याने हेजलवुड चेन्नईसाठी खूप उपयुक्त ठरला असता.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीजनची येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. दरम्यान स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने वैयक्तिक कारणामुळे अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत जोश हेजलवुडने सांगितलं की, मी जवळपास मागील दहा महिन्यांपासून घरापासून दूर आहे. त्यामुळे मला आता क्रिकेटमधून थोडा ब्रेक घ्यायचा आहे. मला काही वेळ माझ्या कुटुंबिंयासोबत घालवायचा आहे. त्यामुळे मी पुढील दोन महिने ऑस्ट्रेलियातच राहणार आहे.
IPL 2021 Captains List: आयपीएलच्या आठ संघांचे कर्णधार कोण? कुणाला किती अनुभव? वाचा सविस्तर...
हेजलवूड पुढे म्हणाला की, आयपीएलनंतर टीम ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौर्यावर जाणार आहे. त्यानंतर टी -20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर अॅशेस मालिका खेळणार आहे. अशारीतीने पुढचे एक वर्ष टीम ऑस्ट्रेलियासोबत मी खूप व्यस्त असणार आहे. म्हणूनच मी आयपीएल 2021 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Exclusive: Josh Hazlewood has withdrawn from his #IPL stint with @ChennaiIPL & hopes to be playing the #SheffieldShield final in a fortnight | @samuelfez https://t.co/y9ZcYGH6li pic.twitter.com/d3fcALQPyv
— cricket.com.au (@cricketcomau) March 31, 2021
IPL 2021 Schedule : आयपीएलच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...
आयपीएल 2020 मध्ये हेजलवुड सीएसकेच्या संघात सामील
विशेष म्हणजे आयपीएल 2020 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने हेजलवुडला आपल्या संघात सामील करुन घेतलं होतं. मात्र, गेल्या वर्षी त्याला केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यात त्याने एक विकेट घेतली. मागील वर्षी आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती, परंतु यावेळी आयपीएल भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत हेजलवुड चेन्नईसाठी खूप उपयुक्त ठरला असता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)