IND vs SA : सूर्यकुमारने जिंकली केरळच्या फॅन्सची मनं, मोबाईलमध्ये संजूचा फोटो दाखवत केला खास इशारा, पाहा VIDEO
Sanju Samson : संजू सॅमसन हा मूळचा केरळचा असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन्स आहेत. त्यात आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना केरळ येथेच खेळणार आहे.
IND vs SA : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी (India vs South Africa) सज्ज झाला आहे. पहिला सामना केरळच्या तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया केरळ येथे पोहोचली असता सूर्यकुमार यादवच्या एका कृतीमुळे त्याने सर्वच केरळ फॅन्सची मनं जिंकली. टीम इंडियाची बस एअरपोर्टवरुन हॉटेलच्या दिशेने निघाली असता केरळचे फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी उभे होते, त्यावेळी सूर्याने आपल्या फोनमध्ये संजूचा फोटो फॅन्सना दाखवत थम रिएक्ट केलं. त्याच्या या कृतीने फॅन्सही बरेच आनंदी झाल्याचं दिसून आलं. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू असल्याने त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
संजू सॅमसन हा मूळचा केरळचा असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन्स आहेत. त्यात आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना केरळ येथेच खेळणार असला तरी संजू संघात नसल्याने फॅन्स काहीसे नाराज आहेत. अशामध्ये सूर्याने संजूचा फोटो फॅन्सना दाखवत एकप्रकारे त्याची आठवण काढल्याने फॅन्स काहीसे आनंदी झाल्याचं दिसून आलं.
पाहा व्हिडीओ -
RR Admin since 2013:pic.twitter.com/Tvb1VwsAuD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 26, 2022
भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 28 सप्टेंबर 2022 | तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 2 ऑक्टोबर 2022 | गुवाहाटी |
तिसरा टी-20 सामना | 4 ऑक्टोबर 2022 | इंदूर |
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोंबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-