IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज!
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीनं ही मालिका कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची असेल.
IND vs SA T20 Series: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीनं ही मालिका कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची असेल. दरम्यान, टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाकडं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. भारताला मायदेशात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या 28 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांचा टी-20 मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेृतत्वाखाली भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारण्यासाठी सज्ज झालाय.
भारतानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत तीन द्विपक्षीय मालिका खेळलीय. यातील दोन मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. तर, एका मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं विजय मिळवलाय. दरम्यान, 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तीन भारताचा 2-0 असा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये खेळण्यात आलेली टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीनं सुटली. तर, आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारत दौरा केला होता. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्या ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतानं पुढील दोन सामन्यात विजय मिळवला. पंरतु, या मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. ज्यामुळं ही मालिकाही बरोबरीत सुटली.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 7 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळली गेली. यापैकी भारतानं तीन मालिका जिंकल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मालिकेत विजय मिळवता आलाय. यातील दोन मालिका अनिर्णित ठरल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-