Watch : अन् विराट चेक घेऊनच पळाला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजयानंतर किंग कोहलीची मैदानात मजा-मस्ती
Virat Kohli : भारतीय क्रिकटचा स्टार खेळाडू विराट कोहली आशिया चषक स्पर्धेपासून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतत असून आता आगामी वर्ल्डकपसाठी अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष त्याच्याकडे आहे.
Virat Kohli Funny video : जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागील काही वर्षांपासून खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येत होतं. पण नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) कोहलीनं दमदार शतक ठोकत एकप्रकारे फॉर्ममध्ये पुनरागमन केलं. दरम्यान विराट हा फक्त त्याच्या खेळासाठीच नाही, तर मैदानावरील त्याच्या विविध गोष्टींमुळे चर्चेत असतो. मग त्यात त्याचं अॅग्रेशन तसंच मजामस्तीही सामिल असते. विराटने नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये अर्धशतक ठोकलं आणि त्यानंतर मालिकेतील दमदार कामगिरीमुळे अवार्ड मिळलं असता त्याने मस्ती म्हणून अवार्डचा चेक मिळताच पळण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा Funny Video व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO -
Virat after getting the "Energetic player of the series" Award😭😂😭😅 #KingKohli #ViratKohlipic.twitter.com/XwzRNBT3me
— Ana de Armas stan (@abhithecomic) September 26, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांमध्ये टॉप 10 मध्ये कोहली
विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या क्रमाकांवर आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 34 हजार 357 धावा केल्या. यानंतर राहुल द्रविड 24 हजार 208 धावांसह दुसऱ्या तर विराट कोहली 24 हजार 078 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील क्रिकेटर्सचा विचार करता कोहली सातव्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कामगिरी
विराट कोहलीनं 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विराटला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 20 सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर येताच त्याच्या खेळीत पूर्णपणे बदल पाहायला मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. विराटनं टी-20 क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी केली. विराट कोहली अशा काही फलंदाजांपैकी एक आहे, ज्यांची या फॉरमॅटमध्ये फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. विराट कोहलीनं 107 टी-20 सामन्यात 3 हजार 660 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-