Legends League : आज मैदानात पडणार षटकार-चौकारांचा पाऊस, सेहवाग-गेल मैदानात, कधी, कुठे पाहाल भिलवाडा किंग्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना?
LLC 2 : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आज भिलवाडा किंग्स आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ मैदानात उतरणार असून दोन्ही संघात असणाऱ्या माजी दिग्गज खेळाडूंमुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
![Legends League : आज मैदानात पडणार षटकार-चौकारांचा पाऊस, सेहवाग-गेल मैदानात, कधी, कुठे पाहाल भिलवाडा किंग्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना? Legends League Cricket Bhilwara Kings vs Gujrat Giants match timings and live Legends League : आज मैदानात पडणार षटकार-चौकारांचा पाऊस, सेहवाग-गेल मैदानात, कधी, कुठे पाहाल भिलवाडा किंग्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/27/a363f099508431cb0d426d26839fffe41664265729096323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
LLC 2022, Bhilwara Kings vs Gujrat Giants : जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटर सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदा या स्पर्धेचा दुसरा हंगाम पार पडत आहे. भारताच्या विविध शहरात होणाऱ्या या सामन्यांमध्ये आज कटकमध्ये सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणेच वेगवेगळ्या देशाचे खेळाडू एकमेंकासोबत मिळून सामने खेळत आहेत. आज (27 सप्टेंबर) भिलवाडा किंग्स आणि गुजरात जायंट्स कॅपिटल्स (Bhilwara Kings vs Gujrat Giants) हे संघ आमने सामने येणार आहेत.
आज सामना पार पडणाऱ्या दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. अशामध्ये भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण तर गुजरात जायंट्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग करणार आहे. विशेष म्हणजे गुजरात संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग असून त्याच्यासोबत ख्रिस गेलही संघात असणार आहे. त्यामुळे दोन्ही स्फोटक फलंदाज मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने आज चौकार आणि षटकारांचा पाऊस पडू शकतो. तर नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरु शकतात यासाठी दोन्ही संघ पाहूया...
कसे आहे दोन्ही संघ?
गुजरात जायंट्स:
वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), डॅनियल व्हेटोरी, ग्रीम स्वॅन, तिलकरत्ने दिलशान, ख्रिस गेल, पार्थिव पटेल, मनविंदर बिस्ला, एल्टन चिगंबुरा, जोगिंदर शर्मा, यशपाल सिंह, रयाद एमरित, केविन ओब्रायन, रिचर्ड लेवी, अशोक डिंडा, थिसारा परेरा, अजंता मेंडिस, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लाघन.
कधी, कुठं पाहायचा सामना?
लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (27 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता कटकच्या बाराबती क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
दसऱ्यादिवशी रंगणार फायनलची लढत
लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला आहे. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं आहेत. ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले जातील. लीगचा अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)