एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात टीम इंडिया नवी जर्सी घालून उतरणार मैदानात!

T20 World Cup 2022: टीम इंडियानं  (Team India) ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपली मोहीम तीव्र केलीय.

T20 World Cup 2022: टीम इंडियानं  (Team India) ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपली मोहीम तीव्र केलीय. दरम्यान, टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलीय. यातच टीम इंडिया जर्सीबाबत (Team India Jersey) महत्वाची माहिती समोर आलीय. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट भागीदार 'एमपीएल स्पोर्ट्स'नं एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये टीम इंडिया टी-20 विश्वचषकात नव्या जर्सीत दिसणार आहे. ज्यानंतर टीम इंडियाची जर्सी कशी असेल? याबाबात चाहत्यांमध्ये उस्तुकता लागली आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या टी-20 संघानं लॉन्च केलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना खूप आवडली होती. 

'एमपीएल स्पोर्ट्स'नं शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहे. या व्हिडिओत रोहित म्हणतोय की, चाहत्यांनीच आम्हाला क्रिकेटर बनवलंय. तर, श्रेयस म्हणतोय की, चाहते ज्या प्रकारे खेळाडूंचा उत्साह वाढवतात, त्याच्याशिवाय खेळामध्ये मजा नाही येत. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा भाग बनण्यासाठी तयार व्हा, असं हार्दिक पांड्या बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी कशी असावी? याबाबत सल्ले देण्यास सुरुवात केलीय. काही चाहते आकाशी रंगाच्या जर्सीची मागणी करत आहेत. तर, 2007 च्या विश्वचषकात घालण्यात आलेली जर्सी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या अंगावर पाहायला मिळेल, अशीही चाहत्यांकडून अपेक्षा केली जात आहे. 

एमपीएलचा व्हिडिओ- 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

आस्ट्रेलियाच्या प्रमुख शहरात पार पडणार स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये  16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget