IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारताची कामगिरी कशी? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी
India vs Australia T20I Series: भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia Tour Of India) दौऱ्यावर येणार आहे.
India vs Australia T20I Series: भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia Tour Of India) दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेला येत्या 20 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं आतापर्यंत एकही टी-20 मालिका गमावली नाही. यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारतीय संघ चांगली कामगिरी बजावेल? अशी अपेक्षा केली जातेय.
भारतानं मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत सात टी-20 सामने खेळले आहेत. यातील चार सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, ऑस्ट्रेलियानं तीन सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन संघानं भारतात फेब्रुवारी 2019 मध्ये अखेरचा टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात भारताला दोन विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताचा पराभव झाला होता. यापूर्वी भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चार सामने जिंकले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या टी-20 संघात सुर्यकुमार यादव, दीपक हुडा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक महत्वाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचंही संघात पुनरागमन झालंय. हे दोन्ही खेळाडू आशिया चषकात भारतीय संघाचा भाग नव्हते. आगामी टी-20 विश्वचषकात पाहता बीसीसीआय कोणताही प्रकारचा धोका पत्कारणार नाही.
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
हे देखील वाचा-