(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sourav Ganguly: ग्रेग चॅपलसोबतच्या वादामुळं कर्णधारपद सोडावं लागलं, त्याच वादावर सौरव गांगुलीनं सोडलं मौन!
Sourav Ganguly On Greg Chappell: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपलकडं 2005 साली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Sourav Ganguly On Greg Chappell: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपलकडं 2005 साली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, जॉन राइट्सनंचा कार्यकाळ संपणार असताना सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपलची भेट झाली होती. सौरव गांगुलीच्या मते, ग्रेग चॅपल ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाड शकतात. पण जॉन राइटचा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रेग चॅपलची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यानंतर सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातील वाद चर्चेत आला.
ग्रेग चॅपलच्या वादावर सौरव गांगुली म्हणाला की, "जीवनात अशा गोष्टी घडतात, यामुळं या वादाला चूक म्हटलं जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मोठी जबाबदारी सोपवतात, परंतु, प्रत्येकवेळी तुमचा निर्णय योग्य ठरेल, असं नाही. माझं असं मत आहे की, हा एक जीवनाचा भाग आहे. यामुळं याला चूक म्हणता येणार नाही." ग्रॅग चॅपलसोबतच्या वादानंतर सौरव गांगुलीला भारतीय संघाचं कर्णधारपद सोडावं लागलं होतं. एवढेच नव्हे तर, त्याला भारतीय संघातूनही बाहेर पडावं लागलं होतं.
पुढे सौरव गांगुली म्हणाला की, ज्यावेळी त्याला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं अवघड नव्हतं. पण ज्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं, हे पाहता थोडं अवघड दिसत होतं. सौरव गांगुली म्हणला की, जेव्हा भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं, तेव्हा त्यानं ब्रेक समजून या गोष्टींना सामोरे गेला. कारण गेल्या 13 वर्षापासून तो क्रिकेट खेळत होता. सौरव गांगुलीचं मत आहे की, जे काही घडलं? त्याला क्रिकेटच्या मैदानातून उत्तर देणं कठीण होतं. ते माझ्या क्षमतेच्या बाहेर होतं. त्यामुळं मला काही करता आलं नाही.
हे देखील वाचा-