IND Vs Sri: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका बंगळुरूमध्येच! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडून स्पष्ट
IND Vs Sri: भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ दोन सामन्याची कसोटी आणि दोन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे.
IND Vs Sri: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्याची कसोटी मालिका बंगळुरूमध्येच खेळवली जाणार आहे, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्ट केलंय. ऑस्ट्रेलियाचा दौरा केल्यानंतर श्रीलंकेच्या संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ भारताशी दोन कसोटी आणि दोन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरुवातीला कसोटी मालिका खेळली जाणार होती. परंतु, श्रीलंका बोर्डाच्या विनंतीनंतर आधी टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिका बंगळुरू येथे खेळवली जाणार आहे, असं सौरव गांगुलीनं स्पष्ट केलंय. आयएएनएसनं यासंदर्भात वृत्त दिलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका गुलाबी चेंडूनं खेळवली जाणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला त्यांच्या टी-20 संघाच्या सुरक्षित बबल-टू-बबल हस्तांतरणासाठी कसोटी सामन्यांपूर्वी टी-20 मालिका खेळण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यामुळं श्रीलंका बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.
भारतानं आतापर्यंत फक्त दोनच गुलाबी चेंडूचे कसोटी सामने खेळले आहेत. भारतानं बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये पहिला सामना खेळला होता. त्यानंतर दुसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. हे दोन्ही सामने भारतानं जिंकले होते.
हे देखील वाचा-
Yash Dhull: यश धुलची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी; क्रिकेटसाठी वडिलांनी सोडली नोकरी, पेन्शनवर उदरनिर्वाह चालायचा, आता गाजवतोय मैदान
ICC U19 World Cup: यश धुलचा उत्तुंग षटकार! टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर चेंडू पाठवला मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
IPL 2022: आयपीएलचे साखळी सामने मुंबई, पुण्यात खेळले जाणार; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha