ICC U19 World Cup: यश धुलचा उत्तुंग षटकार! टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर चेंडू पाठवला मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
ICC U19 World Cup: आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय.

ICC U19 World Cup: आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारतानं 96 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात भारताच्या कर्णधार यश धुलनं 110 धावा केल्या. परंतु, त्याच्या शतकापेक्षा त्यानं टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर लावलेल्या उत्तुंग षटकाराची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर आयसीसीनं यश धुलचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज टॉम व्हिटनीच्या गोलंदाजीवर धुलनं उत्तुंग षटकार मारला. धुलनं मारलेला चेंडू चक्क मैदानाबाहेर जाऊन पडला. यासाठी आयसीसीनं धुलच्या शॉटचं कौतूकही केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
व्हिडिओ-
View this post on Instagram
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा धुल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरलाय. याआधी उन्मुक्त चंद आणि विराट कोहलीनं अंडर- 19 वर्ल्ड कपमध्ये शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताचा संघ अंडर- 19 वर्ल्डच्या अंतिम फेरीत पोहचलाय. भारतीय संघ अंतिम फेरीत इंग्लडशी लढणार आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतंय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- हे देखील वाचा-
- IPL Mega Auction 2022: कगिसो रबाडा मालामाल होणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी
- Happy Birthday Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या आठव्या हंगामात ऋतुराजची मोठी कामगिरी, विराट आणि धोनीलाही टाकलं मागे
- Australian Open 2022: ऐतिहासिक कामगिरी! ऍशले बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




















