IPL 2022: आयपीएलचे साखळी सामने मुंबई, पुण्यात खेळले जाणार; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
IPL 2022: भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळरू येथे मेगा ऑक्शनचा (IPL Mega Auction) पार पडणार आहे.
IPL 2022: भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळरू येथे मेगा ऑक्शनचा (IPL Mega Auction) पार पडणार आहे. बंगळरू येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी बीसीसीआयनं (BCCI) स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाईल? याची घोषणा करावी, अशी मागणी सर्व फ्रँचायाझींकडून करण्यात आली. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) महत्वाची माहिती दिलीय. आयपीएलचे साखळी सामने मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) होईल, असं सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलंय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 590 खेळाडूंची यादी जाहीर
बीसीसीआयनं आयपीएलच्या मेगा लिलावासाठी 590 देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचायझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल.
मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळणार
आयपीएलच्या या मेगा ऑक्शनमध्ये भारताच्या श्रेयस अय्यर, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, ईशांत शर्मा, उमेश यादव या शिलेदारांना चढ्या भावात विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळाले.
या परदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता
परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये फाफ ड्यू प्लेसी, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेण्ट बोल्ट, क्विन्टन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन आणि वानिन्दू हसरंगा या नावांवर दौलतजादा होण्याची चिन्हं आहेत. तसंच देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पंड्या, शाहरुख खान, दीपक हुडा, आवेश खान, यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवीकुमार, अंगक्रिश रघुवंशी या उदयोन्मुख खेळाडूंना विकत घेण्यासाठीही फ्रँचायझी उत्सुक असतील.
- हे देखील वाचा-
- IPL Mega Auction 2022: कगिसो रबाडा मालामाल होणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी
- Happy Birthday Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या आठव्या हंगामात ऋतुराजची मोठी कामगिरी, विराट आणि धोनीलाही टाकलं मागे
- Australian Open 2022: ऐतिहासिक कामगिरी! ऍशले बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha