एक्स्प्लोर

AUS vs SA T20 WC Final Live Streaming: आज रंगणार महिला विश्वचषकाची फायनल, ऑस्ट्रेलियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

AUSW vs SAW: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना आज रंगणार असून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये ही फायनल खेळवली जाणार आहे.

AUS vs SA T20 WC Final : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून आज फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये (Australia vs South Africa) ही फायनल खेळवली जाणार आहे. एकीकडे सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुनही सेमीफायनलमध्ये अवघ्या  5 धावांनी पराभूत झाल्यामुळे भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. दरम्यान भारताला मात देणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडला नमवून फायनल गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. तर आजच्या या महत्त्वाच्या सामन्याची माहिती जाणून घेऊ... 

कधी होणार सामना?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (Australia vs South Africa WC Final) आज अर्थात, 26 फेब्रवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना महिला संघांमधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर (Newlands Cricket Stadium) होणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसे असू शकतात दोन्ही संघ? 

दक्षिण आफ्रिका संभाव्य इलेव्हन : लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, सुने लुस (कॅप्टन), क्लो ट्रायॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा

ऑस्ट्रेलिया संभाव्य इलेव्हन : अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅश्ले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डार्सी ब्राउन

भारत सेमीफायनलमध्ये पराभूत

स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ (Team India) यंदा विश्वचषक जिंकेल असं वाटत होतं. पण सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभूत व्हावं लागलं. ज्यामुळे भारतीय महिला संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 172 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 167 धावांपर्यंत मजल मारु शकला.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Embed widget