AUS vs PAK : बाबर आझमचा फ्लॉ शो सुरुच, 7 चेंडूत फक्त 1 धाव काढून तंबूत
AUS vs PAK : मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. बाबरने 7 चेंडू खेळत केवळ 1 धाव केली आहे. पॅट कमिंसने त्याला बोल्ड केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला बाबर चांगली कामगिरी करेल, अशी आशा होती.
Babar Azam : पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमचा (Babar Azam) फ्लॉप शो सुरुच आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. बाबरने 7 चेंडू खेळत केवळ 1 धाव केली आहे. पॅट कमिंसने त्याला बोल्ड केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला बाबर चांगली कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र, अजूनही बाबरला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात बाबरला पहिल्या डावात 21 तर दुसऱ्या डावात केवळ 12 धावा करता आल्या आहेत.
पॅट कमिंसची आक्रमक गोलंदाजी (Pat Cummins)
पॅट कमिंसने आक्रमक गोलंदाजी करत बाबरला बोल्ड केले. पॅट कमिंसने टाकलेला चेंडू स्विंग होऊन आत आला. यानंतर बाबरकडे याचे उत्तर नव्हते. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावसंख्या 6 बाद 194 इतका आहे. रिझवान 29 तर अमीर जमाल 2 धावा बनवत क्रिजवर आहेत. पाकिस्तानी चाहत्यांचे लक्ष आता मोहम्मद रिझवानकडेच असणार आहेत. रिझवान सोडला तर इतर सर्व पाकिस्तानी फलंदाज तंबूत परतले आहेत. आता गोलंदाज कशी फलंदाजी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अब्दुला शफीकची अर्धशतक खेळी (Abdullah Shafique)
मेलबर्न कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 दावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून सलामीवीर अब्दुल्ला शफीकने अर्धशतक झळकावले. त्याने 109 चेंडूमध्ये 62 आणि कर्णदार शान मसूदने 76 चेंडूमध्ये 54 धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी रचत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, बाबर आझम आणि इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकच्या आशा मावळल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंसने ३ , नेथन लायनने २ आणि जोश हेजलहुडने १ विकेट पटकावली.
पाकिस्तान मालिकेत 0-1 ने पिछाडीवर
यापूर्वी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली होती. कांगारूंना 318 धावांपर्यंत रोखण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश आले होते. पाककडून आमिर जमालने ३ विकेट्स पटकावल्या. शिवाय, शाहीन अफरीदी, मीर हमजा आणि हसन अलीने प्रत्येकी 2 विकेट पटकावल्या. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनची अर्धशतकी खेळी
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने 155 चेंडूमध्ये 63 धावांची खेळी केली. लाबुशेन शिवाय उस्मान ख्वाजाने 42 तर मिचेल मार्शने 41 धावा केल्या. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 154 धावांची आघाडी आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, सध्या ऑस्ट्रेलियाने सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या