K L Rahul Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला
K L Rahul : एका बाजूला पडझड होत असताना दुसरीकडे राहुलने आफ्रिकन गोलंदाजांचा मारा निष्प्रभ करत झुंझार खेळी साकारली. राहुलच्या शतकाने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
![K L Rahul Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला ind vs sa kl rahul century record break against south africa centurion 1st test K L Rahul Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/27/c7d31f4ae65ce5008d034b26076733ef1703674322359290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KL Rahul Century IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (Ind Vs SA Test Match) पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज-यष्टिरक्षक के. एल. राहुल (K.L.Rahul) याने झुंजार शतक झळकावले. सेंच्युरियन मैदानात सुरू असलेल्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव अडचणीत आला असताना राहुलने संघाला सावरले. एका बाजूला पडझड होत असताना दुसरीकडे राहुलने आफ्रिकन गोलंदाजांचा मारा निष्प्रभ करत झुंझार खेळी साकारली. राहुलच्या शतकाने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने सचिन तेंडुलकर आणि कोहलीचाही विक्रम मोडला आहे.
टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 245 धावा उभारल्या. यामध्ये के. एल. राहुलने 101 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या केल्या. त्याने 38 धावांची खेळी साकारली. तर, शार्दुल ठाकूरने 24 धावांची खेळी करत राहुलला मैदानात साथ दिली.
राहुल मैदानावर फलंदाजीला तेव्हा टीम इंडियाची 4 बाद 92 धावा अशी स्थिती होती. त्यानंतर 121 धावा झाल्यानंतर सहावी विकेट पडली. त्यानंतर राहुलने शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यासोबतीने राहुल टीम इंडियाचा डाव सांभाळला आणि एक सन्मामजनक धावसंख्याही उभारली.
राहुलचा विक्रम
भारताच्या पहिल्या डावात राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या काळात त्याने 137 चेंडूंचा सामना करत 101 धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने 14 चौकार आणि 4 षटकार लगावले. सेंच्युरियनमधील राहुलचे हे दुसरे कसोटी शतक ठरले. येथे भारतासाठी फलंदाजी करताना तो एका डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. राहुलने 101 धावा केल्या. याआधी ऋषभ पंतने नाबाद 100 धावा केल्या होत्या.
सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला
सेंच्युरियनमध्ये कसोटी शतक झळकावणारा राहुल हा तिसरा खेळाडू आहे. येथे सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने कोहली आणि सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिन आणि कोहलीने प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. कोहलीने 2018 मध्ये शतक झळकावले होते. सचिनने 2010 मध्ये शतक झळकावले होते.
सध्या फॉर्मात आहे राहुल
केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 48 कसोटी सामन्यांमध्ये 2743 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. राहुलने डिसेंबर 2014 मध्ये भारताकडून पहिला सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 75 एकदिवसीय सामन्यात 2820 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. राहुलने 72 टी-20 सामन्यात 2265 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)