Hardik Pandya: हार्दिक पांड्या कर्णधार बनताच 63 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार
Hardik Pandya: भारतीय कसोटी संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झालाय. या दौऱ्यात भारताला पुढे ढकलण्यात आलेला कसोटी सामन्यासह तीन सामन्यांची टी-20 मालिक आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
Hardik Pandya: भारतीय कसोटी संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर भारताला पुढे ढकलण्यात आलेला एक कसोटी सामन्यासह तीन सामन्यांची टी-20 मालिक आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तर, भारताचा दुसरा संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आरर्लंडशी दोन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे, हार्दिक पांड्या कर्णधार बनताच 63 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.
दरम्यान, 1959 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ एका वर्षाच्या आत पाच खेळाडू संघाचं नेतृत्व करताना दिसतील. यावर्षी जानेवारीपासून चार खेळाडूंनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. बीसीसीआयनं नुकतीच आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आणि हार्दिक पांड्या संघाचं कर्णधारपद संभाळणार असल्याची माहिती दिली. यामुळं हार्दिक पांड्याच्या रुपात यावर्षी भारतीय संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पाचवा खेळाडू ठरेल.
हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मांकड, गुलाबरॉय रामचंद आणि पंकज रॉय यांनी 1959 मध्ये भारताचं नेतृत्व केलं. या खेळाडूंनी एका वर्षात भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद संभाळलं होतं. त्यावेळी फक्त कसोटी क्रिकेटचा ट्रेंड होता. पण 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन फॉरमॅट आहेत आणि या तीन फॉरमॅटमध्ये या वर्षात आतापर्यंत चार कर्णधार पाहायला मिळाले आहेत. तर आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या संघाची जबाबदारी संभाळणारा पाचवा कर्णधार असेल.
भारतीय संघात खेळाडूंची कमतरता कधीच नव्हती. सध्या तरी दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहेत. एवढेच नाही तर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू बेंचवर बसलेले आहेत. याशिवाय अनेक धाकड खेळाडू निवडीच्या प्रतीक्षेत आहेत.
हे देखील वाचा-