एक्स्प्लोर

PAK vs AFG: पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई, आफगाणिस्तानचा 300 धावांचा डोंगर, गुरबाजचे दीडशतक

पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर आफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दमदार कमबॅक केलेय

PAK vs AFG:  पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर आफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दमदार कमबॅक केलेय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. आफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात ३०० धावांपर्यंत मजल मारली. आफगाणिस्तानचा सलामी फलंदाज गुरबाज याने दीडशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी 301 धावांचे आव्हान मिळाले आहे.


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामीच्या जोडीने पहिल्या 10 षटकांत कोणताही बिनबाद 48 धावांपर्यंत मजल मारत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
यानंतर दोघांनीही वेगाने धावसंख्या वाढवण्यावर भर दिला.  गुरबाज आणि जद्रान यांच्यात पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची मोठी भागीदारी पाहायला मिळाली. पाकिस्तानविरुद्ध 2010 नंतर वनडे फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाला 50 षटकांत 300 धावा करता आल्या. गुरबाजशिवाय इब्राहिम झद्रानने 80 धावांची खेळी केली. दुसरीकडे पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 तर नसीम शाह आणि उस्मा मीरने 1-1 विकेट घेतली.

गुरबाजच्या नावावर विक्रम - 
श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने आक्रमक फलंदाजी केली.  या युवा यष्टीरक्षक फलंदाजाने या सामन्यात केवळ 122 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील 5 वे शतक ठोकले.  गुरबाज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. रहमानउल्ला गुरबाजने 25 व्या डावात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 5 वे शतक झळकावले. यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ शतके झळकावणारा गुरबाज आता जागतिक क्रिकेटमधील तिसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली 5 शतके पूर्ण करण्यासाठी दोघांनी 19-19 डाव खेळले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget