(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhinav Manohar: 6,6,6,6... महाराजा ट्रॉफीत अभिनव मनोहरनं पाडला षटकारांचा पाऊस, गोलंदाजांना धू धू धुतलं...
Maharaja Trophy T20 2024: महाराजा ट्रॉफीत अभिनव मनोहरनं धमाकेदार फलंदाजी केली. त्यानं टी 20 मॅचमध्ये 9 षटकार मारले.
Maharaja Trophy T20 2024 बंगळुरु: कर्नाटकात सध्या महाराजा ट्रॉफी सुरु आहे. शिवमोग्गा लायन्स आणि हुबळी टायगर्स यांच्यातील मॅच बंगळुरुत झाली. या मॅचमध्ये पहिल्यांदा फलंदाजी हुबळी टायगर्सनं केली होती. यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या शिवमोग्गा लायन्सच्या अभिनव मनोहरनं षटकारांचा पाऊस पाडला.
महाराजा ट्रॉफी टी20 2024 या स्पर्धेतील शिवमोग्गा लायन्स आणि हुबळी टायगर्स यांच्यातील मॅच जोरदार झाली. अभिनव मनोहरनं या मॅचमध्ये 9 षटकार मारले. त्यानं हुबळी टायगर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 27 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केल्यान संघानं 6 विकेटनं हुबळी टायगर्सला पराभूत केलं.
हुबळी टायगर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 19.3 ओव्हर्समध्ये 141 धावा केल्या होत्या. मनीष पांडेनं 44 धांवांची खेळी केली होती. त्यानं 31 बॉलमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार मारले होते. मनवंत कुमारनं 13 बॉलमध्ये 28 धावा केल्या. त्यानं षटकार मारले यामुळं हुबळी टायगर्सनं 141 धावा केल्या. यानंतर शिवमोग्गा लायन्सनं अभिनव मनोहरच्या फलंदाजीच्या जोरावर 15. 1 ओव्हरमध्येच ही मॅच जिंकली.
अभिनव मनोहर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानं 27 बॉलमध्ये 70 धावा केल्या. यामध्ये त्यानं 9 षटकार आणि 2 चौकार मारले. मनोहरच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट 259.26 इतका राहिला. हुबळी लायन्सचा कॅप्टन निहाल यानं 34 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
मनोहरनं महाराजा ट्रॉफीत शानदार कामगिरी केली आहे. यापूर्वी त्यानं म्हैसूर वॉरिअर्स विरुद्ध 46 धावांची खेळी केली होती. गुलबर्गा मिस्टिक्सच्या विरुद्ध देखील त्यानं 55 धावा केल्या होत्या. अभिनव मनोहरनं आतापर्यंत 36 टी 20 मॅच खेळल्या आहेत. यात त्यानं 623 धावा केल्या आहेत.
अभिनव मनोहर तबड़ तोड़ पारी खेली ।
— SHARK CRIC IN HINDI (@CricketGayata) August 24, 2024
अभिनव मनोहर ने 29 बॉल पर 70 रन की पारी खेली ।
उनकी पारी मे 9 छक्के 2 चौके और 255 का स्ट्राइक रेट ।#AbhinavManohar #MaharajaTrophy pic.twitter.com/uLejHEmUOA
इतर बातम्या :