Shikhar Dhawan : शिखर धवन निवृत्तीनंतर नवी इनिंग सुरु करणार? हुमा कुरेशीसोबत यापूर्वीच दाखवलेली अनोखी झलक
Shikhar Dhawan : शिखर धवनने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आता त्याच्या नव्या इनिंगचीही चर्चा सुरु झाली आहे.
Shikhar Dhawan : भारतीय किक्रेट संघाचा खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. पण असं असलं तरीही तो आयपीएल सामने खेळणार आहेत. शिखर धवन हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याचप्रमाणे त्याच्या डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावर बरेच व्हायरल होतात. इतकच नव्हे तर क्रिकेटसह शिखर धवनने बॉलीवुडमधील एका सिनेमातही काम केलं आहे.
शिखर धवन हा 2022 साली आलेल्या डबल एक्सएल या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा देखील होत्या. दरम्यान यापूर्वी देखील त्याने अभिनय करण्यास तयारी दाखवली होती. पण या सगळ्याचा त्याच्या क्रिकेटवर कोणताही परिणाम होता कामा नये अशी त्याची अट होती. त्यामुळे आता क्रिकेटनंतर ही तर शिखरची नवी इनिंग नसणार असा प्रश्न डोकाऊ लागला आहे.
डबल एक्सएल सिनेमा झळकला होता शिखर धवन
त्याला डबल एक्सएल सिनेमाची कथा खूप आवडल्याने तो हा सिनेमा करत असल्याचं शिखरने म्हटलं होतं. शिखरची जोडी हुमा कुरेशीसोबत होती. या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
शिखर धवनचा पहिला सिनेमा ठरला होता सुपरफ्लॉप
4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या 'डबल एक्सएल' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 25 लाख रुपयांचे निराशाजनक कलेक्शन केले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई फक्त 60 ते 70 लाख रुपये होती. हा त्या वर्षातील सर्वात मोठा सुपर फ्लॉप होता.
ओटीटीवर शिखर धवनचा सिनेमा
'डबल एक्सएल'मध्ये झहीर इक्बालचीही भूमिका आहे. 4 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सतराम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे लेखन मुदस्सर अझीझ आणि साशा सिंग यांनी केले आहे. तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तो कधीही नेटफिल वर पाहू शकता.
शिखर धवनचं क्रिकेट करिअर (Shikhar Dhawan Cricketer Career)
शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. विशेष म्हणजे एकदा मैदानावर उतरल्यानंतर तो आक्रमकपणे खेळून समोरच्या गोलंदाजाला घाम फोडायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच भारतीय संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. त्याने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत. 38 वर्षीय शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता.