Pakistan Cricket : ऑस्ट्रेलियानं तिकडे पाकिस्तानला लोळवलं! इकडे लाहोरमध्ये मोठी उलथापालथ, PCB ने घेतला 'हा' निर्णय
Australia Beat Pakistan by 7 Wickets : पाकिस्तान क्रिकेट संघांनी अचानक आपल्या पांढऱ्या चेंडूचा मुख्य कोच बदला.
Aaqib Javed White-Ball Head Coach of Pakistan Cricket Team : जोश इंग्लिशच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या टी-20 मालिकेपूर्वी दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने 2-1 ने विजय मिळवला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने बदला घेतला आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली.
तिकडे ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला लोळवलं पण इकडे लाहोरमध्ये मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट संघांनी अचानक आपल्या पांढऱ्या चेंडूचा मुख्य कोच बदला. आता ही जबाबदारी निवड समितीमध्ये समाविष्ट असलेला माजी क्रिकेटपटू आकिब जावेद पेलणार आहे, जेसन गिलेस्पीची जागा घेणार आहे. गॅरी कर्स्टन यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी गिलेस्पीला देण्यात आली होती. आता तो फक्त कसोटी फॉरमॅटमध्ये संघाचा कोच असले, तर आकिब एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे कोचिंग सांभाळेल.
Aqib Javed confirmed interim white-ball head coach
— PCB Media (@TheRealPCBMedia) November 18, 2024
Details here ⤵️ https://t.co/lNkZ7QRW4z
माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे PCB ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या कार्यकाळात आकिब पुरुष निवड समितीचे वरिष्ठ सदस्य म्हणून काम करत राहतील. जावेदला कोचिंगचा खूप अनुभव आहे, त्याने पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्ससोबत काम केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते UAE चे मुख्य प्रशिक्षक आणि श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक देखील राहिले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान पुरुष संघाला झिम्बाब्वेमध्ये (24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर) तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि दक्षिण आफ्रिकेत (10 ते 22 डिसेंबर) तीन मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आघाडीवर पाकिस्तान 8-14 फेब्रुवारी दरम्यान एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे देखील यजमानपद भूषवणार आहे.
हे ही वाचा -