Omkar Salvi RCB Bowling Coach : मेगा लिलावाच्या आधी RCBचा मास्टरस्ट्रोक, मुंबईला चॅम्पियन बनवणारा कोच लागला गळाला
आयपीएल 2025 मेगा लिलाव सुरू होण्याच्या काही दिवस आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक मोठे पाऊल उचलले आहे.
Omkar Salvi RCB Bowling Coach IPL 2025 : आयपीएल 2025 मेगा लिलाव सुरू होण्याच्या काही दिवस आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबईच्या घरच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, फ्रँचायझीनेच याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र क्रिकेट वर्तुळातमध्ये ही बातमी पसरली आहे की आरसीबीने ओंकार साळवीचा लिलावापूर्वी समावेश केला आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आरसीबीने सध्याचे मुंबईचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांची इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 हंगामासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मार्चमध्ये देशांतर्गत हंगाम संपल्यानंतर साळवी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात भूमिका बजावणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने मार्चमध्ये 2023-24 रणजी ट्रॉफी आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इराणी कप जिंकला होता.
A NEW BOWLING COACH FOR RCB...!!!! 👊
— Johns. (@CricCrazyJohns) November 18, 2024
- Omkar Salvi to be roped as the new bowling Coach of RCB. [Devendra Pandey (@pdevendra) From Express Sports] pic.twitter.com/mmZdjOvN2K
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेमध्ये सामील होण्यापूर्वी ओंकार साळवीने कोलकाता नाइट रायडर्समध्ये सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे त्याचा भाऊ आविष्कार साळवी हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे आणि पंजाबचा मुख्य प्रशिक्षक होता.
Omkar Salvi - RCB's new bowling coach. pic.twitter.com/99oRxJh7sZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 18, 2024
ओंकार साळवी हा लो प्रोफाईल प्रशिक्षक असला तरी देशांतर्गत स्तरावर त्याची कामगिरी लक्षणीय आहे. साळवी 2023-24 हंगामापूर्वी मुंबईचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि ते येताच त्यांनी मुंबईला 42 व्या रणजी ट्रॉफी जिंकून दिले. 8 वर्षातील हे मुंबईचे पहिले रणजी विजेतेपद होते आणि एमसीएने नंतर साळवीला आणखी एका हंगामासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनी इराणी कप जिंकला.
मेगा लिलावापूर्वी आरसीबीने केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. विराट कोहलीला 21 कोटी रुपये मानधन देऊन संघाने कायम ठेवले. रजत पाटीदारला 11 कोटी तर यश दयालला 5 कोटी पगारावर कायम ठेवण्यात आले होते. आता लिलावात फलंदाजासोबतच गोलंदाजाच्या शोधात असणार आहे. अष्टपैलू खेळाडूंवरही आरसीबीची नजर असेल.
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाहमध्ये होणार आहे. यासाठी 574 खेळाडूंना अंतिम रूप देण्यात आले आहे. 81 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 27 खेळाडूंची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये आहे. आता या लिलावात एकूण 204 खेळाडू विकत घेतले जाणार आहेत. त्यात 70 परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे. या सर्व खेळाडूंसाठी 641.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर 558.5 कोटी रुपये राखून ठेवण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. सर्व 10 संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
हे ही वाचा -