एक्स्प्लोर

Commonwealth Games मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाशला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांच राज्य शासनाला पत्र

Avinash Sable : महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे

Avinash Sable Parents Letter : बीडच्या पाटोदा तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळेने (Avinash Sable)  नुकत्याच बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) स्पर्धेत 3000 मीटर ट्रिपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक पटकावलं. अविनाशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि त्यांन केलेल्या पदकाच्या कमाईमुळे आंतरराष्ट्रीय दर्जावर भारताचा सन्मान आणखी वाढला. सर्व देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव हो असताना आता अविनाशला आर्थिक मदतीची गरज असल्याची मागणी अविनाच्या आई-वडिलांनी राज्य शासनाला पत्र लिहित केली आहे.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून सराव करून अविनाश हा आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळू लागला. त्याने अनेक स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली आणि त्याचं नाव जगभरात ओळखलं जाऊ लागलं. आता याच अविनाश साबळेला मदतीची गरज असल्याचं सांगत त्याच्या आई-वडिलांनी आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाला एक पत्र लिहिलं आहे. अविनाशने राष्ट्रकुल स्पर्धेत अर्थात कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राधा बीनोद शर्मा यांनी अविनाशचे आई वडील यांची त्याच्या मांडवा गावात जाऊन भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतर अविनाशचे आई आणि वडील यांनी आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. आणि या आशयाचं एक पत्र त्यांनी आष्टीचे तहसीलदार यांना दिलं आहे.

'राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जाईल.'

इतर राज्यामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून प्रथम क्रमांक तीन कोटी रुपये द्वितीय क्रमांक दोन कोटी रुपये आणि तृतीय क्रमांक एक कोटी रुपये अशी आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती अविनाशच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी हे पत्र राज्य शासनाला लिहिलं आहे यावर बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याशी विचारणा केली असता या पत्राची तात्काळ दखल घेऊन राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीचा एक प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family | न्यायाची प्रतीक्षा, देशमुख कुटुंबाचं अन्नत्यागाचं हत्यार Special ReportIndrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोनPakistan ICC Champions Trophy | कधीही न पाहिलेल्या पाकिस्तानची सफर 'एबीपी माझा'वर Special ReportZero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget