पहिल्या मॅरेथॉनमध्ये 100 रुपये बक्षीस मिळवलं, बीड ते बर्मिंगहॅम अडथळ्याच्या शर्यतीची अविनाश साबळे याची यशोकहाणी
Majha Katta : Avinash Sable: माझे शिक्षक मला मॅरेथॉनसाठी घेऊन गेले. ती मॅरेथॉन 500 मीटरची होती. त्या मॅरेथॉनसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती, मात्र मी जिंकलो: अविनाश साबळे
Majha Katta : Avinash Sable: ''माझे शिक्षक मला मॅरेथॉनसाठी घेऊन गेले. ती मॅरेथॉन 500 मीटरची होती. त्या मॅरेथॉनसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती, मात्र मी जिंकलो'', असं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताला रौप्यपदक मिळून देणारा धावपटू अविनाश साबळे म्हणाला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रेरणादायी माझा कट्टामध्ये बोलताना त्याने आपल्या जीवन प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे.
आपल्या जीवनातील प्रवासाबद्दल सांगताना अविनाश साबळे म्हणाला, ''माझ्या जीवनात मी लहानपणापासूनच संघर्ष पाहत आलो आहे. घरात मी मोठा होतो. आम्ही तीन भाऊ बहीण. मी 4 ते 5 वर्षांचा असताना आई-वडील वीटभट्टीवर काम करायला जायचे. आम्ही झोपेत असायचो, तिघेही. पण मी कधी-कधी उठायचो. आम्ही उठायच्या आधी, ते आमच्यासाठी स्वयंपाक बनवून कामावर निघून जायचे. सकाळी गेले की, ते आम्हाला संध्याकाळीच दिसायचे. आई-वडिलांनी खूप कष्ट केले. मात्र त्याची जाणीव त्यांनी आम्हाला कधीही होऊ दिली नाही.
'शिक्षकांनी खूप मदत केली'
''माझे शिक्षक मला मॅरेथॉनसाठी घेऊन गेले. ती मॅरेथॉन 500 मीटरची होती. त्या मॅरेथॉनसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती, मात्र मी जिंकलो'', असं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताला रौप्यपदक मिळून देणारा धावपटू अविनाश साबळे म्हणाला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रेरणादायी माझा कट्टामध्ये बोलताना त्याने आपल्या जीवन प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे.
अविनाश साबळे म्हणाला, ''त्यावेळी धनोरा मॅरेथॉनमधून होती, ज्यात मला माझे शिक्षक घेऊन गेले होते. त्यात ते मला दोन वर्ष घेऊन गेले. त्यात दोन वर्ष माझा पहिला क्रमांक आला. यानंतर मी 7 वीला असताना महाराष्ट्राची नैपुण्य चाचणी होती. त्यात क्रीडा प्रबोधिनीमधून निवड केली जात होती. त्यावेळी मला शिक्षकांनी सांगितलं की, यात निवड झाली की शिक्षण मोफत होतं आणि खेळत ही तू खूप पुढे जाशील. त्यावेळी माझे शिक्षक वडते सर यांनी मला सांगितलं होतं की, तुला कोणी विचारलं तर त्यांना सांगायचं मला फक्त धावणीत पुढे जायचं आहे.'' तो पुढे म्हणाले, तिथे गेल्यानंतर पहिल्या वर्षी मला खेळायला मिळालं नाही. त्यांनी फक्त सराव करून घेतला. त्यानंतर मला अॅथलेटिक्स खेळ मिळाला. त्यावेळी माझी उंची खूप लहान होती. त्यामुळे इतर खेळाडूंच्या तुलनेत माझा रिझल्ट चांगला आला नाही. त्यावेळी त्यांनी मला चार वर्षांचा वेळ दिला. त्यानंतरही माझा रिझल्ट चांगला आला नाही. म्हणून मला तिथून बाहेर पडावं लागलं. यानंतरची दोन वर्षे माझ्यासाठी खूप कठीण होती.
स्टीपलचेसमध्ये पहिल्याच वर्षी झालो नॅशनल चॅम्पियन
अविनाश साबळे म्हणाला की, बारावीनंतर सैन्यात भरती झालो. त्यानंतर पुन्हा मॅरेथॉन पळू लागलो. तो म्हणाला, ''स्टीपलचेस माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्यावेळी मला सगळे सांगत होते. हे खूप अवघड आहे. तू नको करू नकोस. मात्र मी ठरवलं आणि यात आलो. स्टीपलचेसमध्ये 400 किमी धावून मी खूप थकायचो. त्यावेळी सैन्याचे प्रशिक्षक अमरीश कुमार ते मला म्हणाले, तू स्टीपलचेसमध्ये खूप चांगलं करू शकतो. पहिल्याच वर्षी मी नॅशनल चॅम्पियन झालो.