(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं
IND vs WI : सामन्यात वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच मनं जिंकली.
India vs West Indies 2nd ODI : भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवर (India vs West Indies) दोन विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळवला. अगदी अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने शानदार षटकार खेचला. ज्यानंतर प्रेक्षकांसह खेळाडूंनीही जोरदार आनंद साजरा केला. दरम्यान सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बोलताना अखेरच्या षटकात अक्षरसोबत क्रिजवर असणाऱ्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj), 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' असं वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यावरुन त्या क्षणी मैदानात काय परिस्थिती होती, याचा अंदाज येतो. या वक्तव्याचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला असून यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
'मलाही वाटत होतं मीही सिक्सर मारला असता'
सामन्यानंतर खेळाडूंचा जल्लोष करतानाचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला असून यामध्ये सिराजही आपली प्रतिक्रिया देत आहे. तो म्हणतो, कि अखेरच्या षटकात अक्षरला पाहून तो नक्कीच सिक्सर मारेल असं वाटत होतं. तशी परिस्थितीच होती आणि तो तशाच फॉर्ममध्ये देखील होता. अक्षरला बघून मलाही असं वाटत होतं की मीही सिक्सर मारु शकतो. पण त्याक्षणी मी एक धाव घेऊन अक्षरला स्ट्राईक देणंच योग्य होतं.
पाहा व्हिडीओ -
Reactions from the dugout and change room as @akshar2026 sealed the ODI series in style 😎👏#TeamIndia #WIvIND pic.twitter.com/ZB8B6CMEbP
— BCCI (@BCCI) July 25, 2022
मालिका भारताच्या खिशात
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने दोन गडी राखून जिंकला आहे. ज्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI Highlights : रोमहर्षक सामन्यात भारत दोन विकेट्सनी विजयी, अक्षरचं शानदार अर्धशतक, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी
- Shai Hope : शाय होपने शानदार शतक झळकावत केली अनोखी कामगिरी, 'या' यादीत झाला सामिल