(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022, Medal Tally : पाचव्या दिवशी भारताच्या खिशात चार पदकं, दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदकांवर कोरलं नाव
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने पाचव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक खिशात घातली असून दोन रौप्य पदकंही जिंकली आहेत.
India in Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज जिंकलेल्या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या 13 वर गेली आहे.
अनपेक्षित सुवर्णपदक
भारताने दिवसातील सर्वात पहिलं पदक हे एक सुवर्णपदक जिंकलं. भारतीय महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला 17-10 च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकलं आहे. आधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला (India vs New Zealand) मात देत अंतिम फेरी गाठली आहे होती. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच भारत लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ कमाल फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलं आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य
भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील (Commonwealth Games 2022) जबरदस्त कामगिरी कायम असून आता वेटलिफ्टर विजय ठाकूर (Vijat thakur) याने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे.
टेबल टेनिसमध्ये सुवर्ण कामगिरी
कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पाचवं सुवर्णपदक नावे केलं ते म्हणजे टेबल टेनिसमध्ये. टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत भारतानं हे पदक मिळवलं आहे. भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरला (India vs Singapore) मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने 3-1 च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला.
बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकावर समाधान
आतापर्यंतच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी कमाल कामगिरी केली, पण अखेरच्या सामन्यात मलेशियाविरुद्ध (India vs Malaysia) पराभव पत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागत आहे. पण या पदकामुळे भारताची पदकसंख्या 13 झाली आहे. अटीतटीच्या झालेल्या फायनलच्या सामन्यात भारत 3-1 च्या फरकाने पराभूत झाला.
हे देखील वाचा-