AFC Women's Asian Cup : चीन पीआरने व्हिएतनामला नमवलं, 3-1 ने मिळवला विजय
AFC Women's Asian Cup : चीन पीआर संघाने (China PR) एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 स्पर्धेत (AFC Women's Asian Cup) व्हिएतनाम (Vietnam) संघाला 3-1 ने मात देत उपांत्य फेरी (Semi Finals) गाठली आहे.
AFC Women's Asian Cup : चीन पीआर संघाने (China PR) एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 स्पर्धेत (AFC Women's Asian Cup) व्हिएतनाम (Vietnam) संघाला 3-1 ने मात देत उपांत्य फेरी (Semi Finals) गाठली आहे. या अप्रतिम विजयासह 2023 च्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत थेट स्थानही मिळवलं आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चीन पीआरकडून वाँग शाँग, वाँग शानशान आणि जियाली टँग यांनी प्रत्येकी एक गोल करत हा विजय साकारला. उपांत्य फेरीत चीन पीआरला आता जपानचा सामना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे व्हिएतनाम आता प्ले ऑफ सामन्यात अप्रतिम कामगिरी केल्यास फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करेल.
असा पार पडला सामना
सामन्यात सुरुवातीलाच सातव्या मिनिटाला चीन पीआरच्या वाँग शाँगने गोल केला. परंतु रेफ्रींनी ऑफ साइड दिल्याने हा गोल ग्राह्य धरला नाही. दोन मिनिटांनी चीनच्या टँग जियालीने मारलेल्या हेडरवर चेंडू बारला लागला. चीनच्या या आक्रमणानंतरही व्हिएतनामने 11 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर चीनने आपली आक्रमकता आणखी वाढवत 25 व्या मिनिटाला वाँग शाँगने संघाला बरोबरी साधून देत शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करत मध्यंतराला 1-1 गोल अशी बरोबरी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात चीनने आणखी यश मिळवलं. 52 व्या मिनिटाला वाँग शानशानने चीन पीआरला आघाडी मिळवून देताना संघाचा दुसरा गोल केला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला टँगने व्हिएतनामच्या बचावफळीची कमजोरी हेरली आणि तिने व्हिएतनामच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत चीनला तिसरा गोल करुन दिला ज्यानंतर 3-1 अशा गोल फरकाने विजय मिळवला.
हे देखील वाचा-
- AFC Women's Asian Cup : जपानचा थायलंडवर विजय; उपांत्य फेरीत धडक
- AFC Women's Asian Cup : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मात देत कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
- Women Asia Cup : तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची चीनवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha