एक्स्प्लोर
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांच्या वेळेत बदल
धर्मशाला आणि मोहालीत होणारा पहिला आणि दुसरा सामना ठरलेल्या वेळेपूर्वी दोन तास अगोदर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने दव आणि थंड वातावरणामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. धर्मशाला आणि मोहालीत होणारा पहिला आणि दुसरा सामना ठरलेल्या वेळेपूर्वी दोन तास अगोदर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने या दोन सामन्यांसाठी सुधारित वेळापत्रक जारी केलं. त्यानुसार, दोन्ही सामने दुपारी 1.30 ऐवजी सकाळी साडे अकरा वाजता सुरु होतील. त्यामुळे हे सामने पूर्णपणे डे नाईट नसतील. धर्माशालेत 10 डिसेंबरला आणि मोहालीत 13 डिसेंबरला वन डे खेळवण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केल्यानंतर वेळेत बदल करण्यात आला, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली. पहिले दोन वन डे सामने साडे अकरा वाजता सुरु होतील. उत्तर भारतातील खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. विशाखापट्टणममध्ये होणारा तिसरा वन डे सामना ठरलेल्या वेळेवरच सुरु होईल, असंही सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा























