एक्स्प्लोर

रणजी करंडक विदर्भाच्या खिशात, नागपुरात जोरदार सेलिब्रेशन

विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकावर नाव कोरल्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आनंदाचं वातावरण आहे.

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकावर नाव कोरल्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आनंदाचं वातावरण आहे. 84 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाचा संघ रणजी करंडकाच्या फायनल मध्ये पोहोचला आणि चॅम्पियन ठरला. त्यामुळे युवा क्रिकेटर्स आणि क्रिकेटचं प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये नवचैतन्य पसरलंय. या विजयामुळे फक्त विदर्भ क्रिकेटला नवीन भरारी मिळेल असे नाही, तर भविष्यात विदर्भाच्या मातीतून नवीन खेळाडू तयार होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट अकॅडमीमध्ये रजनीश गुरबानी, सिद्धेश नेरळ, सिद्धेश वाट आणि आर संजय हे रणजी जिंकणाऱ्या टीमचे चार खेळाडू कधी काळी प्रशिक्षण घ्यायचे, तिथे आज आनंदाचं वातावरण आहे. तिथले युवा खेळाडू भविष्यात आम्हीही विदर्भासाठी खेळून रणजी करंडक जिंकू, असा विश्वास व्यक्त करत आहेत. विदर्भाची बलाढ्य दिल्लीवर 9 विकेट्स राखून मात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला. दिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली. रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. संबंधित बातमी : विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडकाचा मान

महत्त्वाच्या बातम्या

Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
IND vs NZ 4th ODI : तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
IND vs NZ 3rd ODI : ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड
ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड
Kane Williamson : विराट कोहलीला एक कॉल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; केन विल्यमसनने निवृत्तीचा निर्णय कसा घेतला?, पहिल्यांदाच बोलला!
विराट कोहलीला एक कॉल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; केन विल्यमसनने निवृत्तीचा निर्णय कसा घेतला?, पहिल्यांदाच बोलला!

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Rajesh Patil and Ajit Pawar: गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Embed widget