एक्स्प्लोर
प्रशिक्षक नियुक्ती वादावर कर्णधार कोहलीची प्रतिक्रिया
टीम इंडियाच्या प्रशिक्षक नियुक्तीवरुन गेले काही दिवस बराच वादंग निर्माण झाला होता. त्याचविषयी विराटला छेडण्यात आलं.
गॉल (श्रीलंका) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या वादाबाबत कोहलीला आतापर्यंत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. श्रीलंकेसोबतच्या पहिल्या कसोटीआधी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आले. पण कोहलीनं या सर्व प्रश्नांना आज अखेर पूर्णविराम दिला आहे.
प्रशिक्षक नियुक्तीच्या वादाबाबत विराटला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विराट म्हणला की, 'याबाबत (प्रशिक्षक नियुक्त) आम्ही अजिबात लक्ष देत नाही. आम्ही आधीही (रवी शास्त्रीसोबत) एकत्र काम केलं आहे. येत्या काळात याचे आणखी चांगले परिणाम पाहायला मिळतील. आता आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष देत आहोत.'
विराट पुढे म्हणाला, 'या मालिकेत चांगली कामगिरी करुन आमचं कौशल्य दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करु. आम्ही आता एका योग्य पद्धतीनं ट्रेनिंग घेत आहोत. तसंच खेळाबाबत योग्य रितीनं विचार करत आहोत. त्यामुळे संघ म्हणून आम्ही नक्कीच चांगला खेळ करु.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement