IND vs AUS: 'हे खपवून घेतले जाणार नाही'.. वर्णद्वेषी टिप्पणीवरुन कर्णधार विराट कोहली भडकला
सिडनी येथे सुरु असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन विराट कोहलीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) भारतीय संघातील खेळाडूंवर केलेल्या वांशिक टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या तिसर्या कसोटीत तिसर्या व चौथ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वांशिक भाष्य केलं होतं.
कोहलीने ट्विट केले की, "वर्णद्वेषी टिप्पणी अजिबात मान्य नाही. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना अशा अनेक अनुभवानंतर मी असे म्हणू शकतो की ते सहनशीलतेच्या बाहेर आहे. मैदानावर हे पाहणे फार वाईट आहे."
Racial abuse is absolutely unacceptable. Having gone through many incidents of really pathetic things said on the boundary Iines, this is the absolute peak of rowdy behaviour. It's sad to see this happen on the field.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
पुढे तो म्हणतो, की या घटनेचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून पुढे अशा घटना होणार नाहीत.
Racial abuse is absolutely unacceptable. Having gone through many incidents of really pathetic things said on the boundary Iines, this is the absolute peak of rowdy behaviour. It's sad to see this happen on the field.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
या संदर्भात भारतीय संघाने पुन्हा एकदा तक्रार दाखल केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तक्रार दिली, त्यानंतर सामना काही काळ थांबला. पंच आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि प्रेक्षकांच्या दालनात बसलेल्या सहा जणांना मैदानातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्याचवेळी तिसर्या दिवशी सिराज आणि बुमराह यांना वांशिक टीकेला सामोरे जावे लागले.
INDvsAUS | क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल माफी मागितली, प्रेक्षकांवरही कारवाई
त्याचवेळी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले की सिडनी क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांकडून वर्णद्वेषाचे गैरवर्तन करणे काही नवीन नाही. भारतीय खेळाडूंनी यापूर्वी सिडनीमध्ये वर्णद्वेषाचा सामना केला आहे. याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संदर्भात भारताकडे दिलगिरी व्यक्त केली असून ते आयसीसीच्या चौकशीची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे.
India VS Australia | टीम इंडियाचं सिडनीत काय चुकलं? टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर?