![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
INDvsAUS | क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल माफी मागितली, प्रेक्षकांवरही कारवाई
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चहापानाच्या ठीक अगोदर बाऊंड्री लाइनवर वर्णद्वेषी टीका सहन करावी लागली. या प्रकरणाची माहिती सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला दिली
![INDvsAUS | क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल माफी मागितली, प्रेक्षकांवरही कारवाई India vs Australia Siraj Ahmed Racial abuse Row cricket Australia apologises for act strict action taken INDvsAUS | क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल माफी मागितली, प्रेक्षकांवरही कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/10214342/Aus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूविरूद्ध केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माफी मागितली आहे. याप्रकरणी कारवाई करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 6 प्रेक्षकांना मैदानाबाहेर पाठवले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाचे चौकशीचेही आदेश दिले आहेत.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चहापानाच्या ठीक अगोदर बाऊंड्री लाइनवर वर्णद्वेषी टीका सहन करावी लागली. या प्रकरणाची माहिती सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला दिली. त्यानंतर रहाणेने तातडीने पंचांकडे याबाबच तक्रार केली. चहापाना वेळेपूर्वी या संपूर्ण प्रकारामुळे खेळ थोडा वेळ थांबला होता.
सिडनी कसोटीत टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा त्रास होण्याची ही पहिली वेळ नाही. सामन्याच्या तिसर्या दिवशी काही दर्शकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याविरोधात वर्णद्वेषी भाष्य केले होते. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने या प्रकरणी अम्पायर व मॅच रेफरकडे तक्रार केली.
Cricket Australia has reaffirmed its zero-tolerance policy towards discriminatory behaviour in all forms following the alleged racial abuse of members of the Indian cricket squad by a section of the crowd at the SCG yesterday. Full statement ???? pic.twitter.com/34RYcfKj8q
— Cricket Australia (@CricketAus) January 10, 2021
भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील प्रेक्षकांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसून आलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या माफिनाम्यात म्हटलं की, टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा सीए निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून टीका करण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)