एक्स्प्लोर
...म्हणून विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार ठरला : गौतम गंभीर
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघात असल्यामुळेच विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे, असे गंभीरने म्हटले आहे.
गंभीर म्हणाला की, एखाद्या कर्णधाराची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तो आयपीएलमध्ये एखाद्या फ्रँचायजीसाठी नेतृत्व करत असतो. कारण तिथे तुमच्यासोबत मदतीसाठी अनुभवी खेळाडू नसतात. म्हणूनच विराटची आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ) आयपीएलमध्ये यशस्वी ठरली नाही. याऊलट भारतीय संघात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारखे कसलेले शिलेदार विराटच्या मदतीला असतात. या दोघांमुळेच विराट यशस्वी ठरला आहे.
गंभीर म्हणाला की, विराटला अजून खूप मोठी वाटचाल करायची आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट चांगला खेळला पण त्याला खूप काही करायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचं चांगलं नेतृत्व करत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण त्याच्या जोडीला रोहित आणि धोनी आहेत. परंतु आयपीएलमध्ये तो अपयशी ठरतो. त्या तुलनेने रोहित शर्मा आणि धोनी आयपीएलमध्ये खूप यशस्वी झाले आहेत.
गौतम म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून के. एल. राहुलला खूप संधी दिली आहे. आता रोहित शर्माला कसोटीमध्येही सलामीला पाठवायला हवं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
करमणूक
नाशिक
Advertisement